मुरबाडकरांच्या सेवेत आता ‘ईशा नेत्रालय’; १ सप्टेंबरपासून अत्याधुनिक नेत्रसेवा उपलब्ध
गौरव शेलार / मुरबाड : महाराष्ट्रातील नामांकित आय केअर नेटवर्कपैकी एक असलेल्या ईशा नेत्रालयाचे मुरबाड केंद्र १ सप्टेंबर २०२६ पासून मुरबाडकरांच्या सेवेत दाखल होत आहे. गेल्या २५ वर्षांपासून नेत्रसेवेत कार्यरत असलेल्या ईशा नेत्रालयाच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह तज्ज्ञ डॉक्टरांची दर्जेदार नेत्रसेवा आता स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे.
ईशा नेत्रालयाच्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी १० शाखा कार्यरत असून दादर, घाटकोपर, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, पुणे, पिंपरी-चिंचवड यांसह आता मुरबाडमध्येही नेत्रसेवेचा विस्तार करण्यात आला आहे.
ईशा नेत्रालयामध्ये ३५ हून अधिक सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची अनुभवी टीम कार्यरत आहे. शंकर नेत्रालय, अरविंद नेत्रालय, एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट तसेच एम्स (AIIMS), नवी दिल्ली यांसारख्या नामांकित संस्थांमधून शिक्षण व विशेष प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा या टीममध्ये समावेश आहे. त्यामुळे विविध नेत्रविकारांचे अचूक निदान आणि आधुनिक उपचार रुग्णांना उपलब्ध होणार आहेत.
आजवर ईशा नेत्रालयामार्फत १६ लाखांहून अधिक रुग्णांची नेत्रतपासणी, तर २.५० लाखांहून अधिक यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक व USFDA मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध नेत्रविकारांचे निदान आणि उपचार येथे केले जातात.
मोतीबिंदूसाठी AI-सहाय्यित लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तसेच चष्म्यापासून मुक्तीसाठी USFDA मान्यताप्राप्त WaveLight Plus LASIK लेझर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. याशिवाय मोतीबिंदू, रेटिना, काचबिंदू, कॉर्निया, LASIK, बाल नेत्ररोग, ड्राय आय, ऑक्युलोप्लास्टी, व्हिजन थेरपी, तिरळेपणा तसेच न्यूरो-ऑप्थॅल्मोलॉजी यांसारख्या विविध उपचारांची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रुग्णांच्या सोयीचा विचार करून सर्व प्रकारच्या मेडिक्लेमसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध असून पात्र रुग्णांना CGHS, MJPJAY (महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना), PM-JAY (आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) आणि ESIC यांसारख्या विविध शासकीय योजनांअंतर्गत उपचार सुविधा मिळणार आहेत.
“मुरबाड तालुक्यातील नागरिकांना डोळ्यांच्या समस्यांसाठी योग्य निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि अत्याधुनिक उपचार सहज उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ईशा नेत्रालय मुरबाडमध्ये सुरू करत आहोत. मुरबाडकरांसाठी हे नेत्रसेवेचे हक्काचे व्यासपीठ ठरेल,” असा विश्वास ईशा नेत्रालयाच्या रिजनल डायरेक्टर डॉ. पुष्पांजली रामटेके आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. लोमेश पाटील यांनी व्यक्त केला.
ईशा नेत्रालयाचे मुरबाड केंद्र १ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होत असल्याची माहिती रिजनल हेड दीपक कदम आणि मुरबाड सेंटर हेड श्रद्धा विशे (भोईर) यांनी दिली. मुरबाडमध्ये अत्याधुनिक नेत्रसेवा उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होऊन दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



No comments