मुरबाड शहरात उद्या १० ते ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील वीज ग्राहकांसाठी महावितरणकडून महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुरबाड शहरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.मुरबाड टाऊन २२ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीवर ट्री ट्रिमिंग, देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने हा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
या कालावधीत मुरबाड शहरातील वीज ग्राहकांना वीजपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवावी, असे आवाहन महावितरण, मुरबाडकडून करण्यात आले आहे.देखभाल व दुरुस्तीची कामे सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असेही सूचित करण्यात आले आहे.



No comments