खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची सदिच्छा भेट
गौरव शेलार / बदलापूर
:
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि
कुळगाव-बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख, माजी नगराध्यक्ष वामन
म्हात्रे यांची नुकतीच सदिच्छा भेट झाली. यावेळी विविध सामाजिक विषयांवर मनमोकळ्या
गप्पा तसेच सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
कोविड महामारीच्या
कठीण काळात नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असताना, शिवसेना
शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सहकार्याने त्यांच्या
मतदारसंघातील काही नागरिकांना मदत करता आली होती. या सामाजिक कार्यात मिळालेल्या
सहकार्याबद्दल वामन म्हात्रे यांनी यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मनापासून
आभार व्यक्त केले.
संकटाच्या काळात राजकीय मतभेद बाजूला
ठेवून नागरिकांच्या मदतीसाठी एकत्र येण्याची भूमिका हीच खरी सामाजिक बांधिलकी
असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले. या सदिच्छा भेटीमुळे
सामाजिक कार्यातील सहकार्याच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.कोविड काळातील
सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत वामन म्हात्रे यांनी डॉ. अमोल कोल्हे
यांच्याप्रती आभार व्यक्त केले.


No comments