web-banner-lshep2024

Breaking News

५० वर्षीय तपन दुखून नायक बेपत्ता

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तपन दुखू नायक (वय ५० वर्षे) बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून,त्यांचा शोध घेण्यासाठी मुरबाड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपन दुखू नायक हे सावळ्या रंगाचे असून त्यांची उंची सुमारे ५ फूट ६ इंच आहे. त्यांचा चेहरा उभट, डोळे काळे, नाक सरळ व शरीरयष्टी मध्यम आहे. बेपत्ता होताना त्यांच्या अंगात नेव्ही ब्लू रंगाचा फुल शर्ट, काळ्या रंगाची फुल पँट तसेच पायात चप्पल होती. त्यांना बंगाली भाषा येते.

सदर व्यक्तीचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यात आला असूनही अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे आढळून आल्यास तात्काळ मुरबाड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा (संपर्क क्र-8657936964/ 8425852711),असे आवाहन मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले आहे.

No comments