स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा आदर्श
गौरव शेलार / भिवंडी,पडघा : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रकाश भोईर शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगपती दिनेश मारुती भोईर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा भादाणे, जु-पाडा, शेरेकरपाडा, चिंबिपाडा व आतकोली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपसभापती रवींद्र विशे, माजी सरपंच प्रदीप भोईर, सरपंच सौ. जोस्ना भालेकर, उपसरपंच सौ. मेघा प्रदीप भोईर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चिंतामण भोईर यांच्यासह पंकज भोईर, किरण राऊत, रवींद्र निपूर्ते, बालू राऊत, किशोर शेलार, सुभाष राऊत, विनीत राऊत, जयराम राऊत तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणाला प्रोत्साहन देणारे आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावणारे असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.



No comments