web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडमध्ये दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्य वाटप शिबिर; आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांना जिल्हा प्रशासनाची साथ

कुणाल शेलार / मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघातील गरजू ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना आवश्यक सहाय्यभूत साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून मुरबाडमध्ये विशेष मोफत साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी अलिम्को मुंबई आणि जिल्हा प्रशासन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित करण्यात येत असून, सामाजिक बांधिलकी जपत गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.हे शिबिर सोमवार,दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कुणबी समाज हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये पात्र ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर, ट्रायसायकल, कुबड्या, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, चालण्याची साधने तसेच इतर आवश्यक सहाय्यभूत उपकरणे मोफत वितरित करण्यात येणार आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनेक गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असून, संबंधित नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकारातून होत असलेला हा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित नसून, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना स्वावलंबनाच्या दिशेने बळ देणारा संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रयत्न असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

या शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल : उल्हासभाऊ बांगर (९२६०४२००७०),रामभाऊ दळवी (९२०९४०८९९९),मोहन गडगे (९९२२७०१०००),दीपक पवार(८३०८५३५२००),जितेंद्र भावार्थ(९८९०९२५०५६),अनिल घरत(८८८८८२५५५५),प्रकाश पवार सर(९६७३८५०५१०),गोविंद भला(७६२०८३१८२६),मोहन सासे(९८२३१३६२२२),निलेश गायकर(९२७००११९६५)

No comments