web-banner-lshep2024

Breaking News

आषाढी एकादशी निमित्त सिल्वर स्टार मर्सडीस तर्फे भाविकांना अल्पोहार वाटप

 

.संभाजीनगर : आषाढी एकादशी निमित्त वडदगाव छत्रपती संभाजी नगर येथे प्रती पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने भाविक दिंडी सोबत विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी येत असतात. या दिवशी बहुतांशी भाविकांचा उपवास असल्याने त्यांच्या सेवेसाठी विविध संघटनेच्या वतीने अल्पोहाराचे वाटप केले जाते.

दर वर्षाच्या प्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकीच्या हेतूने पुणे अहिल्यानगर रोड येथील राम ऑटोभान-सिल्वर स्टार मिर्सडीस बेन्सच्या शाखेच्या वतीने वारकरी भाविकांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.

या वेळी सिल्वर स्टार वाळुंज शाखेचे ब्रांच हेड विशाल माळी, विष्णू पवार, अब्दुल वारीस, शुभम गायकवाड, कृष्णा बोलकर, अरबाज शेख, गौरव भानुशाली, सचिन नांगरे बापूसाहेब वाघ, प्रगती हिवाळे, साक्षी त्रिपाठी आदी उपस्थित होते

No comments