मुरबाड येथे भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
गौरव
शेलार / मुरबाड :
रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईड, मुरबाड
मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन तसेच अदानी
अंबुजा सिमेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान व मोफत आरोग्य
तपासणी शिबिर आज मुरबाड येथील एमएमए हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या शिबिरात नागरिकांनी
मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले तसेच विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ
घेतला. शिबिरात नेत्र तपासणीसाठी कल्याण येथील ईशा नेत्रालयाच्या तज्ज्ञ
डॉक्टरांची उपस्थिती होती. तसेच रक्तदान व आरोग्य तपासणीसाठी डोंबिवली येथील श्री
चिदानंद रक्तपेढीचे सहकार्य लाभले.
शिबिरादरम्यान
उपस्थितांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदान हे
सर्वोत्तम दान असून समाजातील गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध राहावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या
यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश टीबे, सचिव
संजय माचवे , एमएमएचे अध्यक्ष मुकेश उत्तमानी तसेच अदानी
अंबुजा सिमेंटचे उबेद कुरेशी आणि सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम
घेतले.उपस्थित नागरिकांनी अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे स्वागत करत
भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त
केली.रक्तदान हे जीवनदान या संदेशासह संपन्न झालेल्या या शिबिरामुळे मुरबाड
परिसरातील अनेक नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला.



No comments