शाळेच्या पहिल्या दिवशी तहसीलदार अभिजीत देशमुख यांची बळेगाव शाळेला भेट; विद्यार्थ्यांना दिल्या यशाच्या शुभेच्छा
गौरव
शेलार / मुरबाड : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुरबाडचे तहसीलदार अभिजीत
देशमुख यांनी जि.प. शाळा बळेगाव येथे भेट
देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी
प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
शाळेच्या
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना तहसीलदार देशमुख यांनी
विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाचे महत्त्व,
नियमित अभ्यास, शिस्त, स्वच्छता
आणि चांगले नागरिक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले. "आजचा विद्यार्थी हा उद्याचा जबाबदार नागरिक आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून आपले आणि देशाचे भविष्य घडविण्याची संधी विद्यार्थ्यांकडे
आहे," असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
तहसीलदार
देशमुख यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत अभ्यासाबरोबरच
क्रीडा, सांस्कृतिक आणि
सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षकांनी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे, असेही
त्यांनी सांगितले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद,
ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदारांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शैक्षणिक
वर्षाची सुरुवात प्रेरणादायी वातावरणात झाली.



No comments