ठाणे ग्रामीण पोलिसांची अवैध गावठी हातभट्टीवर धडक कारवाई; शहापूर–भिवंडी परिसरातील अवैध दारू निर्मिती केंद्रांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे
गौरव शेलार / ठाणे : ठाणे ग्रामीण
जिल्ह्यात अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक
गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख १४ हजार ५००
रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत अनेक आरोपींविरुद्ध
गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.पोलीस
अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जिल्ह्यातील
बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश
दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके
तयार करण्यात आली.
भातसा नदी किनारी आणि खुटघर येथे छापे..!
पोलीस
उपनिरीक्षक महेश कदम यांच्या पथकाने शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरलांबे, भातसा नदी किनारा आणि खुटघर परिसरात छापे
टाकले. या कारवाईदरम्यान गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरली जाणारी उपकरणे,
रसायने व इतर कच्चा माल असा ३ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला.या प्रकरणी संतोष नारायण बसवंत (खुटघर), राजेंद्र
अनिल अधिकारी (सरलांबे), श्रीकांत कृष्णा अधिकारी (सरलांबे)
आणि अतुल केशव वलटे (खुटाडी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत
स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भिवंडी
तालुक्यातही कारवाई…!
दरम्यान, पोलीस
उपनिरीक्षक रोहन शेलार यांच्या पथकाने भिवंडी तालुका
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालवार गावाजवळील
खाडी परिसरात झाडाझुडपांमध्ये सुरू असलेल्या अवैध हातभट्टीवर छापा
टाकला. या कारवाईत १ लाख ८३ हजार रुपयांचा कच्चा माल व
साहित्य जप्त करण्यात आले.या प्रकरणी अनिल
रमाशंकर शर्मा आणि रमेश मनोहर
म्हात्रे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या
मार्गदर्शनाखाली कारवाई…!
सदरची कारवाई डॉ.
विनयकुमार राठोड,
पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, तसेच मा. श्री अनमोल मित्तल, अपर पोलीस अधीक्षक,
ठाणे ग्रामीण याचे मार्गदर्शनाखाली व वरीष्ठ पोलीस निरीक्षक,
संदीप गिते, स्थानिक गुन्हे शाखा यांचे
नेतृत्वात पोलीस उप-निरीक्षक, महेश कदम, सफौ प्रकाश साईल, पोहवा संतोष सुर्वे, पोहवा गोविंद कोळी, पोहवा संदीप तांडेल, पोशि स्वप्नील बोडके, पोशि सुरेश धिंदळे, व पोउपनिरी रोहन शेलार, सफौ धनाजी कडव, पोहवा हनुमान गायकर, पोहवा सुहास सोनवणे, पोना योगेश शेळंदे, पोना जितेंद्र वारके या पथकांनी
केली आहे.अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई
सुरू राहणार असल्याचा इशारा ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.



No comments