मुरबाड एसटी स्टँडवर प्रवासी मुलाला मारहाण; ‘तो’ कर्मचारी अखेर निलंबित!
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड एसटी स्टँड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका प्रवासी मुलाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणातील संबंधित एसटी कर्मचाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. संतप्त कर्मचाऱ्याने संतापाच्या भरात प्रवासी मुलाला सार्वजनिक ठिकाणीच मारहाण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येताच प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. या घटनेनंतर एसटी व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.



No comments