web-banner-lshep2024

Breaking News

कु.काव्या विठ्ठल गडगे हिची मिशन भरारी मध्ये जिल्हयातून दुसरा क्रमांक ; इस्त्रो (ISRO) टुरसाठी निवड

गौरव शेलार / मुरबाड : ठाणे जिल्हा परिषद आयोजित मिशन भरारी परीक्षा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात आला. त्यामध्ये इयत्ता 8 वी मध्ये जिल्हा परिषद शाळा शास्त्रीनगर दुधाळेपाडा, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथे शिकणारी विद्यार्थिनी कु.काव्या विठ्ठल गडगे हिने जिल्हयातून दुसरा क्रमांक संपादन केले आहे. राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा मागील महिन्यात झाली. त्याचा विभागीय व जिल्हास्तरीय निकाल नुकतच आला. पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी म्हणून संपूर्ण विभागीय स्तरावर कु.काव्या विठ्ठल गडगे हिने दुसरा क्रमांक मिळवला आहे.

या मुळे काव्या आता इस्त्रोची टूर सवारी करणार असून तिची निवड झाली आहे. मुरबाड शहरातील दुधाळेपाडा येथील शेतकरी विठ्ठल गडगे यांची मुलगी कु.काव्या गडगे इस्त्रोची टूर सवारी करणार असल्याने तालुक्यातून,शहरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या घरच्या परिस्थितीवर मात करून आपले आई-वडिलांचे नाव काव्या हिने सातासमुद्र पार नेले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेतून शिक्षण घेणारी काव्या हिने खऱ्या अर्थाने शिक्षणाचे महत्त्व समजून जाणून घेऊन आपल्या मुरबाड तालुक्याचे नाव लौकिक केले आहे. तिला पुढील वाटचालीस स्वतंत्र संपादक पत्रकार संघाकडून शुभेच्छा देण्यात आले असून या उतुंग यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.


No comments