मुरबाड झेंडा चौक तीन हात नाक्याला फेरीवाल्यांचा विळखा;फेरीवाल्यांमुळे अवैध धंद्याला महामार्ग मोकळा?
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड तीन हात नाका झेंडा चौक हा राष्ट्रीय महामार्ग असून कल्याण माळशेज हायवे तसेच मुरबाड झेंडा चौक येथून शहापूर-नाशिककडे जाणारा महामार्ग आहे.या तीन हात नका झेंडा चौक महामार्गावर अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा पाहण्यास मिळत आहे.
सदरील फेरीवाल्यांमुळे येथे वाहतुकीस वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.मुजोर उद्धटपणाने फेरीवाल्यांची भाषा वाहन चालकांना प्रवाशांना घातक ठरत आहे. याच चौकात मुरबाड नगरपंचायतीने कोटी रुपयाचे रस्ते,झेंडा स्तंभ उभारले.मात्र याच रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांनी आपला बस्थान बांधला असून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे.संबंधित मुरबाड नगरपंचायत, राष्ट्रीय महामार्ग या फेरी धारकांवर कोणत्या प्रकारची कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कल्याण माळशेज घाट हा रस्ता चौपदरी बनला असून या रस्त्यावरील येणारी जाणारी वर्दळ मोठ्या प्रमाणात असते तसेच या झेंडा चौकात मुरबाड तीन हात नाक्याची पोलीस चौकी सुद्धा आहे.याच नाक्यावरून अवैद्यपणाने सुरू असलेल्या धंद्यांना बगळ दिले जात असल्याची चर्चा आहे. याच चौकातून अवैद्यरित्य दारू,गांजा तस्करी होत आहे.याचा उदाहरण दिनांक 21 मार्च 2026 रोजी मुरबाड कर्जत रोडवरील वारे गाव हद्दीत बनावटीची विदेशी दारुनी भरलेले ट्रक नेरळ पोलिसांनी पकडले.
मुरबाड तीन हात नाका येथील फेरीवाल्यांमुळे या अवैध्य धंद्यावाल्यांना महामार्गाचा अवैधरित्य धंदे करण्याचा मार्ग मोकळा असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याकडे संबंधित विभाग अधिकारी कोणत्या पद्धतीची कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.तसेच मुरबाड तीन हात नाका झेंडा चौकाला मोकळा श्वास मिळावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.



No comments