web-banner-lshep2024

Breaking News

अदानीचे स्मार्ट मीटर सक्ती;ग्राहकांना धरलंय वेठीस विटभट्टीवाले फार्महाऊस धारक पोट्रीफार्मवरील चोरट्या विजचोरीला अभय..!

नामदेव शेलार / मुरबाड : पूर्वसूचना न देता मिटरकाढून नेण्याची मोहिम मुरबाडला राबवली जातेय. सध्या तालुक्यात विद्यूत मंडळाची मनमानी चालू असून मुख्यमंत्री व न्यायालयाचे आदेश झुगारून ग्राहकांची संमती न घेता जबरदस्तीने मिटर काढून घेऊन जात असल्याने गोल्य १५ दिवसा पासून ग्राहका मात्र अंधारात चाचपडत आहेत.खेडोपाडयात सध्या मिटर काढून नेण्याची मोहीम कल्याण विभागाकडून सुरू आहे. घरात कोणी नसता मीटर कोण काढून नेले जातात हे ग्राहकांना माहित होत नाही मिटर काढणारे आपल नाव देखील सांगत नाहीत तपास कुठ करावा तर हे सरळगाव व मुरबाड मंडळालाला माहित नसल्याने कोणाकडे दाद मागावी या विवचनेत ग्राहक सापडलेत.

  अदानीचे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी हा अटापिटा तर नसावा अशी शंका येऊ लागली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्याचे संतापजनक प्रकार मुरबाड वीज वितरण विभागाकडून सर्रास सुरू असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. बीज वितरण कंपनीच्या या 'हम करे सो...'ची माहिता शेतकरीनी आंदोलनाचा चेहरा ओळख असलेले माजी जिप सदश्य सुभाष आप्पा घरत यांच्या कडे दाद मागितली आहे वर्षे भरापुर्वी अशीच मनमानी केली असता त्यांनी जाहिर मोर्चा काढून जिरवली होती आत्ता तर कहरच केला जात असून मिटरव्यावस्थित असता व ग्राहक वेळेवर बिल भरीत असता केवळ आडाणीचे मिटर बसविण्याचा अट्टाहास सुरू केला जात असल्याने ग्राहक देखील हे मिटर बसविल्यास अक्रमक झाल्यास जबाबदारी हे मंडळ घेणारी की ग्राहकालाच अरोपी करणार हे काळच ठरवील या विरोधात महिला एकवटल्या आहेत.

   तालुक्यात गेले १५ दिवस वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहक अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे पसरलेले जाळे जीर्ण झाले असून वारंवार बत्ती गुल होण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारामध्ये सुधारणा करण्याची गरज असताना तालुक्यातील गरीब, आदिवासी व सर्वसामान्य वीज ग्राहकांना लक्ष्य करून जुन्या मीटरवरून अचानक जादा मुनिटचे बिल लावणे, तक्रारी करूनही अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करणे, ग्राहक उपस्थित नसताना किंवा लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जात असल्याने ग्राहकांच्या घटनात्मक हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या बीज वितरण कंपनी विरोधात महिलांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

 विशेष म्हणजे, नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांनाही याचा फटका बसत आहे. अनेक ग्राहकांना विजमिटर मध्ये रीडिंग नसल्याचे कारण देत मिटर दुरूस्ती करून देतो असी भलावण करीत या अन्यायकारक कारभाराविरोधात दोषी अधिकारी-कर्मचान्यांवर निलंबनाची कारवाई करावी व ग्राहकांना न्याय द्यावा,तालुक्यातील विटभट्टीवाले मुंबईवाल्याचे फार्म हाऊस पोट्रीवाले खुलेआम आकडा टाकून वीज चोरी करतात त्या कडे दुलर्क्ष केले जात आहे ग्राहकांना वेठीस धरणा-य वितरण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा ग्रामीण भागातून देण्यात आला आहे.

No comments