web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड न्यू इंग्लिश स्कूलच्या विज्ञान आणि वाणिज्य विभागाच्या शिक्षकांचा स्तुत उपक्रम;विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

गौरव शेलार / मुरबाड : बारावी विज्ञान आणि वाणिज्य विभागाचे प्राचार्य कविता पवार मॅडम यांनी बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची कार्यशाळा (ऍक्टिव्हिटी) चाचणी घेऊन विद्यार्थ्यांनी पेपर कसे लिहावे भविष्यात उच्च शिक्षण घेऊन कुटुंबासह सामाजिक कार्यात कसे योगदान द्यावे शाळेचे नाव मोठे करावे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

 दिवसभर चाललेल्या विद्यार्थी कार्यशाळा आणि प्रश्नावली परीक्षा लिखाण अभ्यास सत्र शिक्षणातील स्पर्धा उच्च शिक्षणाचा कानमंत्र शाळेतील शिक्षक शिक्षिका ज्योत्स्ना भोईर, देवयानी जगताप, नीता दळवी, दीपिका चहाड, नीलम लिहे,प्रियांका शर्मा,दुर्गा पष्टे, निकिता पवार ,भाई पवार ,कल्पेश म्हाडसे,सुजाता देशमुख, असावरी धोत्रे यांनी दिला.

वर्षभर आपल्या विषयाचे ज्ञान देऊन शेवटच्या वर्षी शाळेचा उच्च शिक्षणासाठी निरोप घेताना विद्यार्थ्यांचे डोळे पाहणावले विद्यार्थी शिक्षक भावूक झाले होते. मुरबाड न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी डॉक्टर फार्मसी इंजिनियर वकील यूपीएससी एमपीएससी अशा उच्च शिक्षणाकडे पोहोचले आहेत.

त्याचप्रमाणे आत्ताच्या विद्यार्थ्यांनी निर्व्यास्नी राहून मोबाईलचा प्रमाण कमी करून उच्च ध्येय स्वीकारावे शाळा शिक्षक गुरुजन आई-वडिलांचे नाव रोशन करावे असे मोलाचे मार्गदर्शन शिक्षकांनी केले. वर्षभर विद्यार्थ्यांना प्रत्येक सराव परीक्षेला जास्तीत जास्त मार्क पडण्यासाठी शिक्षकांनी ज्यादा तासिक शिकवल्या खाजगी क्लासेस मध्ये पैसे अभावी विद्यार्थी जाऊ शकत नाहीत त्यासाठी शाळेतच खाजगी क्लासेस प्रमाणे मोफत शिक्षण दिले. विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा गुणांना वाव दिला सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊन आपली शाळा आपला लाडका विद्यार्थी घडवण्यासाठी प्राचार्य कविता पवार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले आहे परीक्षापूर्वी आणि परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी शिक्षकांनी दूर केल्याने विद्यार्थी भारावून गेले आहेत.

No comments