web-banner-lshep2024

Breaking News

खुलेनाट्यगृह उभारणीसाठी नगरपंचायतीचा निधी मालकी हक्क जिल्हा परिषदेचा;शाळेतील मुलांना रस्ता बंद नशा करणाऱ्यांना पटांगण खुल्ले..!

नामदेव शेलार / मुरबाड : पाच कोटीच्या आसपास मुरबाड नगरपंचायतीने बेकायदेशीर शासकीय जिल्हा परिषदेच्या जागेत बनवलेला खुलेनाट्यगृह दारू गांजा चोऱ्यामाऱ्या करणाऱ्यांचा खुल्ले पटांगण अड्डा बनला आहे. मराठी शाळा तोडून मुरबाड नगरपंचायतीने शहरातील नागरिकांसाठी खुलेनाट्यगृह संकुलन बनवले मात्र तेथे खुलेआम संध्याकाळपासून रात्रीपर्यंत दारू गांजा धूम्रपान करून चोऱ्यामाऱ्या करणाऱ्यांचा अड्डा बनवला आहे.

     येथून एसटी स्टँड आणि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये जाण्याचा शालेय विद्यार्थी चाकरमानी सामान्य नागरिकांचा रस्ता होता हा रस्ता बंद करून एका बाजूचा गेट खुला करून आत मध्ये संध्याकाळ पासून रात्री उशिरापर्यंत धुम्रपान चालतो मात्र सामान्य नागरिक शालेय विद्यार्थ्यांचा रस्ता मुरबाड नगरपंचायतीने बंद करून मनमानी चालवली आहे त्या विरोधात येत्या पंधरा दिवसात उपोषण करण्याचा इशारा मुरबाड करांनी दिला आहे. खुलेनाट्यगृहाची जमीन महसूल विभागाची असून जिल्हा परिषद शाळेसाठी दिली आहे.

     त्यावर ठाणे जिल्हा परिषदेचा कब्जा अधिकार असताना त्यांची कोणत्याही प्रकारे जमीन मुरबाड नगरपंचायतीने आपल्याकडे भूसंपादित करून घेतली नाही परंतु जिल्हा परिषदेच्या संमतीविना खुलेनाट्यगृहाचे बांधकाम काँक्रिटीकरण विद्युत रोषणाई संरक्षण भिंती अशी पाच कोटीची कामे ठेकेदारीने करून अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली मात्र खुलेनाट्यगृह लगत महिलांसाठी बांधलेल्या शौचालयाची तोडमोड करून तेथे पर्यायी गेट उभारला नाही. नवरात्र उत्सवात खुलेनाट्यगृहात देवीची स्थापना करण्यावरून नगरपंचायतीच्या नगरसेवकात पक्षांतर गटबाजी होऊन नवटंकी हंगामा झाला.

    न्यायालयात दोन्हीही दावेदार गेल्याने खुलेनाट्यगृह बंद केल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली काही दिवसांनी दीपावली नंतर हिंदी भाषकांचा सात दिवसांचा कार्यक्रमासाठी तसेच मुरबाड तालुका कलाक्रीडा उत्सवाचे आयोजक सुभाष पवार यांचा लावणीचा कार्यक्रम तेथेच झाला असे अनेक कार्यक्रम लग्न समारंभ जाहीर सभा कार्यक्रमातून नगरपंचायतीने लाखो रुपये कमविले परंतु त्यांच्या नोंदी पैशाचा हिशोब मुरबाड नगरपंचायत दप्तरी नाही या विरोधात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक वाकचौडे यांनी केले होते त्यांना अद्याप माहिती दिलेली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

    मुरबाड नगरपंचायतीच्या प्रशासक अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून गेटचा टाळा काढून सार्वजनिक रस्ता खुला करण्याची मागणी केली असता खुलेनाट्यगृहाच्या उभारणीसाठी मुरबाड नगरपंचायतीने खर्च कोट्यावधी केला मात्र खुलेनाट्यगृह आमच्या ताब्यात नाही त्यांच्या चाव्या कोणत्यातरी नगरसेवकाकडे असून जिल्हा परिषदेकडे परवानगी घ्यावी लागणार अशी माहिती दिली. खुलेनाट्यगृहाची जिल्हा परिषदेची असताना नगरपंचायतीने कोट्यावधीचा निधी कशासाठी खर्च केला त्याचा फायदा शहरातील प्रभागामधील नागरिकांना होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यावर ठेकेदारावर कारवाई करून शासनाने त्यांच्याकडून खर्च निधीची वसुली करावी.

     एका बाजूचा गेट उघडा ठेवून तेथील व्यावसायिकांच्या गाड्या ठेवण्यासाठी आणि दारू गांजा नशीली धारक चोऱ्यामाऱ्या करणाऱ्यांना मोकळं पटांगण करून ठेवला आहे एक तर दोन्ही गेट बंद करा अन्यथा दोन्ही गेट खुले करा अन्यथा नागरिक उपोषण आंदोलन करून प्रशासनाचा मनमानी मुजोर भ्रष्टाचारी कारभार उघड करून धडा शिकवतील असा इशारा मुरबाड करांनी दिला आहे.

     खुले नाट्यगृह कोण्या एका अधिकारी नगरसेवक ठेकेदार यांची प्रॉपर्टी मालकी नाही सर्व शहरवासीयांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे तेथे महिलांसाठी शौचालय उभारावे सार्वजनिक रस्ता ठेवण्यात यावा भाडेपट्टीने ठेकेदारास देण्यात येऊ नये त्याच खुलेनाट्यगृहा मैदानातील पडित इमारतीची जागा पत्रकार कक्षासाठी यापूर्वीच पत्रकारांनी मागणी केली आहे तेथे पत्रकारांना जाण्यास रोखण्यात येऊ नये अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.

No comments