सरकारी रुग्णालयात उपचार मिळाले नाही एका महिलेचा मृत्यू ;नागरिक संतप्त...
![]() |
फोटो सौजन्य- AI Google |
नामदेव शेलार / मुरबाड : 100 कोटीच्या वर खर्च केलेल्या मुरबाड ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील औषध उपचार नाही तज्ञ डॉक्टर नसल्याने सर्पदंश झालेल्या रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. काल मुरबाड तालुक्यातील चिखले येथील भारती नारायण भोईर वय 45 ही गृहिणी स्वयंपाक करण्यासाठी घराशेजारील सरफन (फाट्या) काढण्यासाठी गेली असता तिला विषारी सापाने दंश केला.
तात्काळ भारती भोईर हिला मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु तिच्यावर औषध उपचार करण्यासाठी सर्प दंशवरील औषधे इंजेक्शन आणि तज्ञ डॉक्टर नसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला भोईर हिचा मृत्यू झाल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी तिला ॲम्बुलन्स मधून उल्हासनगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले.तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता सर्पदंश झालेल्या भारती भोईर हीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात 30 बेडच्या बरोबर विविध सुविधांची जाहिरात बाजी करून शासनाचा निधी मिळवला जातो. कपड्याच्या इस्त्रीपासून बांधकामासह अन्य कामावर आज पर्यंत शंभर कोटीचा निधी खर्च झाला. मात्र या रुग्णालयात सर्पद अंशवरील औषधे आणि तज्ञ डॉक्टर नाहीत.लहान मुलांवर उपचार करणारे डॉक्टर नाहीत ज्या डॉक्टरांना मासिक मानधनावर ठेवले आहेत. त्यांची अनुपस्थिती असते.
मुरबाड तालुक्यात कुठेही अपघात झाल्यास रुग्णांना मुरबाड आणि टोकावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अनेकांचा उपचारा अभावी मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. मुरबाड ग्रामीण रुग्णालयातून नेहमी सर्पदंश आणि अपघाताचे रुग्ण उल्हासनगर, कल्याण, कळवा, ठाणे ,मुंबई येथे उपचारासाठी पाठवले जातात. त्यांना लांब पल्ल्याच्या प्रवासात जीव गमवावा लागत आहे. याकडे आमदार खासदार पुढारी यांचे दुर्लक्ष झाले आहे.



No comments