web-banner-lshep2024

Breaking News

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दहा वर्षांपूर्वीच्या कामांवर काढली बिले..!


नामदेव शेलार / मुरबाड : सर्व विरोधी पक्ष एकत्र होऊन निर्माण झालेल्या भाजपाच्या सत्ताधारी ठेकेदारांनी जुन्या कामांचे इस्टिमेट बनवून शासनाचा निधी पदरात पाडून घेतल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दहा वर्षांपूर्वी रस्त्याचे इस्टिमेट दाखवून रस्ते बनवलेच नाहीत मात्र त्यात रस्त्यावरची बिले तयार करून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोटी रुपये दिले काढले आहेत. 

प्रत्यक्षात रस्ते कामे झालेली नाही तसेच तुळई येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता मातीवर खडी टाकून जुन्या रस्त्याची साईट पट्टी बनवून कोटी रुपये काढले आहेत त्या संबंधि शिवसेनेचे युवा नेते निलेश चौधरी यांनी ठाणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

मुरबाड तालुक्यात भाजपा आणि राष्ट्रवादी या दोनच पक्षांची ठेकेदारी होती भाजपा आमदार यांचे समर्थक आणि माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र सुभाष पवार यांचे समर्थक ठेकेदारी आमने-सामने होते मात्र गेल्या दोन महिन्यापूर्वी सुभाष पवार भाजपात आल्यावर ठेकेदाराविरुद्ध तक्रारी करणारे ठेकेदार शिल्लक राहिलेले नाहीत दोन्हीही बाजूंचे ठेकेदार मिळून मिसळून ठेकेदारी करत असल्याने मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता इंजिनियर हे सत्ताधीशांपुढे काहीही बोलत नसून खोटी बिलांच्या फाईली ठाणे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठवतात. 

या रस्त्याबद्दल कोणी तक्रारी केल्यास अधिकारी ठेकेदारांना माहिती देऊन दबाव तंत्र वापरतात सत्ताधारी आणि सरकारचे मंत्री मुरबाडच्या भ्रष्ट कारभाराला बळ देत असल्याने मुरबाड तालुक्यातील अनेक रस्ते उधळलेले आहेत अधिकारी काही कारवाई करत नाहीत.

No comments