मुरबाड विधानसभा लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचे टेंडर भरणारे सुशिक्षित बेरोजगार;सुबो सोसायटया चौकशीच्या फेऱ्यात पाच कोटीच्या कामाला नगरसेवकाचा विरोध?
नामदेव शेलार / मुरबाड : शासकीय विकास कामांचे टेंडर रजिस्ट्रेशन कंट्रक्शन मजूर सोसायटया,सुशिक्षित बेरोजगार सुबो यांना शासनाने अटी शर्ती घालून दिल्या आहेत त्याची पायमल्ली करून कागदपत्रात हेराफेरी करून ठेकेदारी मिळवली आहे.अशा सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांची चौकशी सुरू झाली आहे गेल्या दहा वर्षात मुरबाड विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड नगरपंचायत जिल्हा परिषद बांधकाम विभाग सह शासकीय प्रत्येक विभागात लोकप्रतिनिधींच्या आदेशाने दहा लाखापासून काही कोटीपर्यंत कामाचे वाटप केले जाते त्यामधून ठेकेदार कार्यकर्ता तयार केला जातो.
मजूर सोसायटयाचे चेअरमन बनावट मजुरांच्या ओळखपत्र नोंदणी तयार करून लाखो कोटीचा ठेकेदारी घेतात तसेच सुशिक्षित बेरोजगार यांनी सिविल इंजिनिअरिंग कोर्स केला आहे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद मध्ये 50 लाखापर्यंत कामे करण्याचा लायसन्स परवाने मिळवली आहेत त्यांच्या परवाने अटी शर्ती अधीन राहून दिलेल्या असताना त्यांनी शासनाच्या अटी शर्तीचे उल्लंघन केले आहेत अशा सर्व सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार मजूर सेवा सोसायटया बांधकाम कंट्रक्शन यांची चौकशी शासनाने एटीएस मार्फत करावी अशी मागणी सामाजिक संघटनेने केली आहे.
50 लाखाचा परवाना असणाऱ्यांनी किती रकमेची कामे वर्षभरात केली आहेत सुशिक्षित बेरोजगाराला पाच कोटीचे काम कोणत्या अटी शर्ती निकषावर दिला आहे त्याची चौकशी शासनाने केल्यास गैरव्यवहार उघड होणार आहे मुरबाड नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता मुख्यालय ठाणे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, मधील कामे अधिकारी आणि ठेकेदार भागीदारीने करत असल्याची माहिती खुद्द ठेकेदारांनी उघड केल्याने खळबळ उडाली आहे.
मुरबाड शहापूर तालुक्यातील 16 कोटीची बोगसकामे,माहिती अधिकार अंतर्गतसमोर आली आहे, या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी दिनेश देशमुख यांनी केली आहे. त्यांनी माहिती अधिकारात माहिती घेऊन कामाचा पडदा फास केला आहे.मुरबाड शहरातील नगरपंचायतच्या बागेश्वरी तलावाचे सुशोभीकरणाचे काम चार कोटी 99 लाखापर्यंत रकमेचा टेंडर सत्ताधारी भाजपाच्या नेत्याच्या मुलाच्या नावे असून ठेकेदार सुशिक्षित बेरोजगार आहेत.इतर सुबो ठेकेदारांना वर्षाला दहा लाखाचा काम मिळत नसताना मुरबाड नगरपंचायत मध्ये तलावाचे सुशिक्षित बेरोजगाराला पाच कोटी पर्यंतचा टेंडर देऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकाच कार्यकर्त्याला करोडपती केला असून निवडणुकीच्या कालावधीत दहा लाखाच्या निधीची कामे काही कार्यकर्त्यांना दिली होती.त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
पाच कोटीचा टेडर काढला तो तलाव वनविभाग जागेवर असताना ठेकेदारी निधी कोणत्या विभागाचा आहे त्या टेंडरची मुदत संपत आली आहे.मुरबाड नगरपंचायतीच्या तलाव सुशोभीकरणाच्या ठेकेदारीला विरोध करून नऊ नगरसेवकांनी भाजपाला रामराम ठोकला असल्याचे बोलले जाते.





No comments