बदलापुरातील डॉक्टर ओसामा शेख अटकेत, उत्तर प्रदेशमधील दहशतवादी कारवाईत संबंध?
बदलापूर : कथित संघटनेची संबंध असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील दहशतविरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर मधून एका डॉक्टरला ताब्यात घेतल्याने बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे. दहशतविरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या त्या डॉक्टरचे नाव ओसामा शेख असल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने बदलापूर शहरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुप्त पद्धतीने ही कारवाई पार पाडली. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या त्या डॉक्टरचे नाव ओसामा शेख असून तो बदलापूर पश्चिमेकडील स्पंदन हॉस्पिटल या रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होता. उत्तर प्रदेश मध्ये सुरू असलेल्या एका संवेदनशील प्रकरणातील आरोपींना ओसामा ऑनलाईन मार्गदर्शन केल्याचे तपासात उघड झाले असल्याचे बोलले जात आहे


No comments