web-banner-lshep2024

Breaking News

गौरी-गणपती सणानिमित्त मुरबाडकरांना सप्रेम भेट दिलेल्या एसटी बस डेपोतून गायब..!

   

नामदेव शेलार/ मुरबाड : मुरबाडला आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने नवीन ५ बसेसचा लोकार्पण सोहळा रविवारी मुरबाड येथे पार पडला पण त्या बसेस रात्रीतून गायब झाल्या असून सोमवारी अनेक बस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले मागील काही दिवसांपूर्वी मुरबाड आगारात 5 बसेस उपलब्ध झाल्या आहेत आणि गौरी गणपती सणाचे औचित्य साधून आणखी नवीन 5 बसेस मुरबाड एसटी आगारास मिळाल्या परंतु त्या बस नेमक्या कुठे गेल्या हे समजले नाही

मुरबाड आजाराच्या बस शिवाय नगर आळेफाटा येथील काही बस मुरबाड येथे आणून ठेवण्यात आल्या होत्या मात्र कल्याण कडे जाणाऱ्या शेकडो प्रवाशांना दिलासा देण्यासाठी यापैकी एकही बस सोडण्यात आली नाही

 याबाबत मुरबाड आगाराचे व्यवस्थापक योगेश मुसळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी दूरध्वनी उचलला नाही सकाळी वाहतूक नियंत्रण व्यतिरिक्त कोणीही वरिष्ठ अधिकारी आगारात उपलब्ध नव्हत, मुरबाड ग्रामीण भागात एसटी बसेस नसल्याने शालेय विध्यार्थी, नागरिक संताप व्यक्त करत आहेत, मुरबाड डेपोत नादुरुस्त गाड्या रस्त्यावर बंद पडतात रात्री दिवसा प्रवाशी हैराण झाले आहेत.

 मुरबाड एसटी डेपो आगार प्रमुख, डिपार्टमेंट ठेकेदारीत रमले आहेत, एसटी डेपोत घाणीचे साम्राज्य असून प्रवाशी शेड नाही, खाजगी वाहने पर्किंग करून पैसे कमवणारे अधिकारी लोकांना सुरळीत एसटी सेवा देण्यासाठी अपयशी ठरले आहेत त्याची तात्काळ हकालपट्टी करावी अन्यथा प्रवाशी जनआंदोलन करतील असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

मुरबाडला दिलेल्या एसटी बसेस लोकांची दिशाभूल करत आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधीना बदनाम करून राजकीय शह कोण भाजपाला देत आहे असा सवाल केला जात आहे.

No comments