पिठोरी अमावस्याला बाजारपेठेत केळी महागली गौरीच्या फुलांना मागणी..!
नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड सह परिसर ठाणे जिल्हा कोकणात येत असल्याने येथे पोळा सण साजरा होत नसून पिठोरी अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते पिठोरी अमावस्याला संध्याकाळी पूजले जाते जशी फुलांची गौराई सारखी सजवली जाते गौरी पूजनाला वापरणारी फुलं वापरली जातात त्यांची पूजा करून विविध प्रकारचे नैवेद्य ठेवले जातात.
रात्रभर जागरण केले जात असून त्या रात्री अनेक ठिकाणी पत्त्याचा डाव रंगतो अमावस्या नवसाची दैवता मानली जाते ज्यांनी मूलबाळ होत नाही असे महिला नवस घेऊन नवस फेडण्यासाठी जातात केळी फळाला जास्त मागणी असते त्यामुळे बाजारपेठेत केळी फळांना उच्चांक भाव असतो अमावस्या पुजण्यासाठी गौरीपूजनाची फुले लागतात त्यांची खरेदी करण्यासाठी सकाळपासून नागरिकांची वरदळ बाजारपेठेत असते मात्र पोळा सण साजरा होत नाही.



No comments