महाराष्ट्र एनसीपी नेता माझी सिडको अध्यक्ष प्रमोदजी हिंदुराव यांची मुरबाडच्या टेक्सटाइल प्रकल्पासाठी दिल्लीत लोकप्रतिनिधींना साकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आश्वासन..!
नामदेव शेलार/ मुरबाड : मुरबाड तालुक्याच्या अतिदुर्गम भागांमधील बेरोजगारी हटवून महिलांना रोजगार व्यवसायात सक्षम करण्यासाठी मुरबाड तालुक्यात टेक्स्टाईल प्रकल्प उभारणीस केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी प्रमोद हिंदुराव यांनी दिल्ली दरबारी साकडे घातले आहे गेल्या पंधरा वर्षापासून मुरबाड मध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला बचत गटांना व्यावसायिक बाजारपेठ छोटे-मोठे लघुउद्योग तसेच बेरोजगारांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार खासदार सुमीत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली टेक्स्टाईल पार्क प्रकल्प उभारणीचा संकल्प केला आहे यापूर्वी मुरबाडच्या टेक्स्टाईल प्रकल्प मुरबाड रेल्वे अन्य उद्योग प्रकल्पांसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राष्ट्रपती उपराष्ट्रपती दिल्लीमधील खासदार महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत.
नुकत्याच राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माझी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी आपल्या कार्यकर्ते कमिटीसह दिल्लीचा दौरा केला राष्ट्रपती भवन संसद भवनाला भेट देऊन राष्ट्रवादीचे नेते तथा ऑल इंडिया वर्किंग कमिटीचे अध्यक्ष प्रफुल पटेल महाराष्ट्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे राज्यसभा सदस्य सुमित्रा पवार तसेच भारत टेक्स्टाईल चे कमिशनर रोहित कंसल यांच्याशी चर्चा केली महाराष्ट्र सह मुरबाड ला येत्या कालावधीत येणाऱ्या नवीन योजना यशस्वी राबवण्याची चर्चा प्रमोद हिंदुराव यांच्यासोबत केंद्राचे टेक्स्टाईल प्रकल्पाचे ॲडिशनल सेक्रेटरी चा कार्यभार सांभाळणारे रोहित कंसल यांच्यात चर्चा झाली महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तथा माजी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दोन दिवस दिल्लीचा दौरा केला.
महाराष्ट्रात सरकार कोणाचेही असू द्या मुरबाडच्या ग्रामीण विकासासाठी प्रमोद हिंदुराव यांचा पुढाकार असतो राजकारण केवळ छंद म्हणून जोपासणारे हिंदुराव यांनी आदिवासी गोरगरीब नागरिक शालेय विद्यार्थी यांना आरोग्य शिक्षण लग्न समारंभ घरबांधणी अपघात अशा अनेक सुखदुःखात मदत केली आहे राज्यात मुरबाड सारख्या ग्रामीण भागातील निष्कलंक निस्वार्थी देवदूत म्हणून प्रमोद हिंदुराव राज्य केंद्र सरकारमध्ये जनतेच्या समस्या सोडवत आहेत मुरबाड रेल्वेचे जनक म्हणून त्यांना संबोधले जाते.




No comments