web-banner-lshep2024

Breaking News

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.धोंडोपंत स्वामी (Dr. D. S. Swami) यांचा गुन्हेगारीला लगाम..!


गौरव शेलार / मुरबाड,ठाणे : ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये फोफावलेली गुन्हेगारी आणि पोलीस प्रशासन नागरिकांमध्ये नसलेला गैरसमज ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर धोंडोपंत स्वामी (Dr. D. S. Swami) यांनी दूर करून गुन्हेगारीला लगाम घातला आहे ठाणे ग्रामीण जिल्हा तसा गुन्हेगारीचा अड्डा बनला होता चोऱ्या दरोडे हाणामाऱ्या अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्याचा केंद्र बनला होताआजही काही तुडळक गुन्हे घडतात त्या गुन्हेगाराना तात्काळ अटक होते, मात्र सामान्य नागरिकांना न्याय देताना त्यांच्या तक्रारी समस्या समजावून घेऊन पोलिसांनी काम करावे गुन्हेगारांना वचक राहील अशी कामगिरी करावी गुन्ह्याचा तपास जलद गतीने करून आरोपींना अटक करावी अशा भूमिकेने ठाणे ग्रामीण भागातील गुन्हेगारीला वचक बसला आहे.   

      ठाणे ग्रामीण जिल्ह्यात कल्याण, टिटवाळा, भिवंडी ग्रामीण, कोन, पडघा ,वाशिंद, शहापूर, मुरबाड,कुळगाव बदलापूर ग्रामीण ,गणेशपुरी या पोलिस ठाण्याचा समावेश आहे. येथील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी अत्यंत चांगले काम करतात काहींच्याकडून चुका होतात त्याला जबाबदार अधिकारी नसतात पुढारपणा असते मात्र पोलिसांची प्रतिमा खराब होते त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी अवैद्य धंद्यांना लगाम घालण्यासाठी प्रयत्न करत असताना लोकांच्या भावना लक्षात घेऊन काम करावे खोट्या गुन्ह्याचा प्रमाण कमी करावा तरुणांना योग्य मार्गदर्शन करावे अशी सूचना पोलिसांना केल्याने ग्रामीण भागात गुन्ह्याचा प्रमाण सुद्धा कमी झाला आहे.

     चोऱ्यांचा प्रमाण सोन्यामध्ये वाढला आहे त्यासाठी पोलिसांची पथक चोरांना आळा घालण्यास पुढे येत असून ठाणे जिल्ह्यात पूर्वीपेक्षा मोर्चे आंदोलने प्रकार कमी होऊन होणारे आंदोलने उपोषणे शांततेने पार पाडतात ही पोलिस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांची कर्तृत्व आहे कठोर कारवाई जेथे हवी तेथे तात्काळ करण्याचा मनसुबा त्यांचा आहे गुन्ह्याचा तपास मोठ्या प्रमाणात लागत असल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांचे सहकारी डीवायएसपी, पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी सर्व अधिकारी गृह विभागाची सुरक्षा यंत्रणा यशस्वी राबवत आहेत.

 


No comments