web-banner-lshep2024

Breaking News

विधी संघर्ष ग्रस्त बालकांचे "मदत'' कक्षाचे उद्घाटन..!

भिवंडी: टाटा सामाजिक विज्ञान संस्था अंतर्गत रिसोर्स सेल फॉर जुवेनाईल जस्टिस (RCJJ), ध्यास समुदाय विकास संस्था, आणि महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने, विधी संघर्ष ग्रस्त बालकांचे पुनर्वसन करणे करीता "मदत कक्ष" या उपक्रमाचे उद्घाटन 24 मे 2025 रोजी बाल न्याय मंडळ निरीक्षण गृह, भिवंडी येथे पार पडले. या कार्यक्रमास श्रीमती. सीमा घुटे, (प्रमुख न्याय दंडाधिकारी, बाल न्याय मंडळ, भिवंडी),शशिकांत बोराटे, (पोलीस उपायुक्त भिवंडी),विनायक गायकवाड, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक),प्रशांत अभंग, (प्रतिनिधी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA)) उपथितीत होते.

श्रीमती सीमा घुटे, (प्रमुख न्याय दंडाधिकारी, बाल न्याय मंडळ, भिवंडी) यांचे शुभहस्ते मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी निरीक्षण गृहातील बालकांन सोबत संवाद साधण्यात आला.विधी संघर्षग्रस्त बालकांना व त्यांच्या पालकांना न्यायालयीन प्रकिये बाबत मोफत सल्ला व मार्गदर्शन या मदत कक्ष मार्फत केले जाते. बालकांच्या गरजा ओळखून बालकांच्या पुनर्वसनासाठी योग्य ती मदत मिळावी आणि त्यांचे समाजात पुनर्वसन व्हावे ह्या उद्देशाने टाटा सामाजिक विज्ञान संस्था अंतर्गत रिसोर्स सेल फॉर जुवेनाईल जस्टिस (RCJJ) यांचे संकल्पनेतून अजीम प्रेमजी फाऊंडेशन मार्फत ध्यास समुदाय विकास संस्थेला देण्यात आलेल्या निधीतून हा उपक्रम राबवण्यात येत आला आहे. अशी माहिती ॲड विजय बाविस्कर प्रकल्प अधिकारी (RCJJ) यांनी दिली

या प्रसंगी उपस्थित मान्यवर शशिकांत बोराटे (DCP भिवंडी ) यांनी मुलांना मार्गदर्शन केले.वाईट संगत आणि व्यसन यामुळे मुले चुकीच्या मार्गाला जातात आणि गुहे करतात तसेच प्रौढ व्यक्ती या बालकांचा वापर गुन्हे करणेसाठी करतात. यामध्ये मुले अडकू नये यासाठी शिक्षण आणि चांगल्या मित्र परिवाराचे किती महत्व आहे हे पटवून दिले. व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रतिनिधी ॲड प्रशांत अभंग यांनी विधी सेवा प्राधिकरण मार्फत बालकांचे पुनर्वसनासाठी कायदेशीर प्रक्रियेत मोफत वकील दिला जातो आणि त्याचा मुलांना कसा फायदा होतो ही भूमिका स्पष्ट केली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष श्रीमती सीमा घुटे ( प्रमुख न्याय दंडाधिकारी भिवंडी) यांनी मुलांशी संवाद साधत विधी संघर्षग्रस्त बालक आणि कुटुंबिय यांनी न्यायालयीन प्रक्रिया आणि बालकांच्या पुनर्वसन करण्यासाठी मदत हवी असल्यास त्यांनी ध्यास समुदाय संस्थे मार्फत सुरू असलेल्या मदत कक्ष या ठिकाणी संपर्क साधून संस्थे मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि पुन्हा चुकीच्या मार्गाला न जाता सुजान नागरिक बनावे ही इच्छा व्यक्त केली.

या कार्यक्रमास सौ संध्या (महिला व बाल विकास विभाग ठाणे ),मराठे व निरीक्षण गृह भिवंडीचे कर्मचारी, आणि ध्यास संस्था प्रतिनिधी कविता निकम (संचालिका), पूजा उबाळे (वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता), विश्वजीत कांबळे, उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ध्यास संस्थेचे संचालक विकास भालेराव यांनी केले. हा उपक्रम विधी संघर्षग्रस्त मुलांच्या पुनर्वसनासाठी मोठा आधार ठरेल आणि त्यांना नव्या जीवनाकडे वाटचाल करण्यास मदत करेल अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

No comments