web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मध्ये घरत अभ्यासिका घडविते मुलांचे भवितव्य..!

नामदेव शेलार / मुरबाड : जगण्यासाठी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वातावरण तयार करून देणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांना काय शिकवले त्याला अर्थ नाही तर तो काय शिकला हे पाहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुरबाड मधील प्रसिध्द घरत अभ्यासिकेचे अनिल घरत सर बळीराम घरत यांनी आमच्याशी बोलतांना केले.

मुरबाड सारख्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य घरत अभ्यासिकाचे संचालक बळीराम घरत सर आणि त्यांचे कुटुंब घडवित आहेत.घरत अभ्यासिका मध्ये या वर्षी सुध्दा 12 वी मध्ये 97 %  ते 91 % पर्यंत 36 च्या वर विद्यार्थी पास झाले आहेत.दर वर्र्षी घरत क्लासेस मध्ये मोठया संख्यात विद्यार्थी पास होत आहेत.

मुरबाड मधील विद्यार्थी हुशार आहेत मात्र आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांना मोफत शिक्षण घरत कुटुंब देत आहेत.अल्प प्रमाणात फीस घेऊन 97 % मार्क मिळवून उच्च शिक्षण घेणारी मुलं मुलींचा आकडा दरवर्षी वाढत आहे.प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश मिळून मुरबाडचं नाव रोशन करावं ही भावना घरत अभ्यासिका डोळयासमोर ठेवून मुलांना घडवत आहेत.

No comments