युद्धबंदीची घोषणा झाल्यावरही पाकिस्तानकडून उल्लंघन,भारताचे जोरदार प्रत्युत्तर; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे खोटे दावे
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (१० मे) उशिरा युद्धबंदी जाहीर करण्यात आली असली, तरी पाकिस्तानने त्यानंतर काही तासांतच युद्धबंदीचे उल्लंघन करत पुन्हा एकदा आपल्या कुरापतीखोर स्वभावाचे दर्शन घडवले. अनेक तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली. मात्र युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन (Pakistan Violates Ceasefire) केले. नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानी सैन्याकडून केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारताने ठोस प्रत्युत्तर दिले असून, सर्व ड्रोन हल्ले भारतीय लष्कराने यशस्वीपणे परतवून लावले.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीन, सौदी अरेबिया, तुर्की, ब्रिटन, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आणि इतर अनेक व्यक्तिमत्त्वे आणि सहयोगी देशांचे भारतासोबत अलिकडेच झालेल्या युद्धबंदीसाठी केलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले असले तरी त्यांनी आपल्या छुपा अजेंडा कायम ठेवत युद्धबंदीचे उल्लंघन केलं आहे.
या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या देशातील जनतेला संबोधित करत भारतावर निराधार आरोप केले. त्यांनी दावा केला की, पाकिस्तानने भारताच्या राफेल लढाऊ विमानांना पाडले असून, भारताने त्यांच्या प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण केला आहे. मात्र भारतीय लष्कराने स्पष्ट केले की, त्यांनी फक्त दहशतवादी अड्डे आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले असून नागरिकांना कोणतीही हानी पोहोचवलेली नाही.
शाहबाज
शरीफ यांची बढाई
शाहबाज शरीफ यांनी लष्करी प्रतिष्ठाने आणि जलसाठ्यांवर हल्ला
केल्याचे खोटे दावे केले. सोबतच त्यांनी बढाई मारली, “आम्ही
शत्रूला अशा भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे जी त्याला चांगली समजते. आम्ही
स्पष्ट केले आहे की ज्या बैठका टेबलावर घ्यायच्या होत्या त्या आता युद्धभूमीवर
होतील.”
पाकच्या
पंतप्रधानांचा खोटा दावा
शाहबाज शरीफ यांनी खोटा दावा करत म्हटले आहे की, “भारताने आपल्या अहंकारात आपली प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाला आव्हान
देण्याचा व्यर्थ प्रयत्न केला.”ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे निष्पाप लोक,
मशिदी आणि नागरी लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले आणि आमच्या संयमाची
परीक्षा घेण्यात आली.” तर भारतीय सैन्याने स्पष्टपणे सांगितले की त्यांनी फक्त
दहशतवादी अड्डे आणि लष्करी तळांना लक्ष्य केले.
No comments