web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये बिर्ल्डरचा प्रताप ;माजी नगराध्यक्षाच्या घरासमोरील गटारीवरील भरावाने दुषित पाणी रस्त्यावर कारवाई करण्यास नगरपंचायत असमर्थ

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरात मोठया प्रमाणात बिल्डींगचे कामे सुरू असून त्यांना डोळे झाकून विविध परवानग्या दिल्या जातात.मुरबाड प्रभाग क्रमांक 7 मध्ये टेकॉन्स बसेरा या बिर्ल्डसने थेट सार्वजनिक गटारीवर कब्जा केल्याचे चित्र दिसत आहे. तर माजी नगराध्यक्षाच्या घरासमोर गटारीवर भराव करून गटारीचे दूषित पाणी लोकांच्या घरात शिरत असल्याचे नागरिकांनी आमच्याशी बोलतांना सांगितले.

    सदरील बिर्ल्डस हे परवानगी घेऊन आपल्या मनमानी प्रमाणे बांधकाम करून सार्वजनिक ठिकाणावरील गटारीवर अनाधिकृत बांधकामे करतात त्याकडे मुरबाड नगरपंचायतीचे पुर्णता दुर्लक्ष होत आहे.

   मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे पारदर्शक कामे करत असून त्यांच्या खालचे अधिकारी, कर्मचारी हे त्यांची दिशाभूल करतात की काय? असा प्रश्नचिंन्ह निर्माण झाले आहे.एखादी तक्रार किंवा पत्र हे मुरबाड नगरपंचायत टपाल विभागात दिल्यास तो पत्र मात्र खालचे अधिकारी निकाली काढतात अशी चर्चा मुरबाडकरांमध्ये सुरू आहे.

No comments