web-banner-lshep2024

Breaking News

ओतूर येथे शरदचंद्र पवार कालेजमध्ये करिअर मार्गदर्शन विषयावर कार्यशाळा संपन्न


ओतूर : श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये गुरुवार दिनांक १७/४/२०२५ रोजी करियर मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली .या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे विजय पवार (उद्योगमित्र बिजवर्स फाउंडेशन पुणे) प्राध्यापक मंगेश खैरे (सीईओ पर्पल हॅट इन्स्टिट्यूट नाशिक ) संगणक विभागप्रमुख डॉ सुनील खताळ, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकमुनिकेशन विभाग प्रमुख प्राध्यापक नीता बाणखेले , मेकॅनिकल विभागप्रमुख प्राध्यापक सचिन जाधव त्याचप्रमाणे कार्यशाळा समन्वयक डॉ मोनिका रोकडे , प्राध्यापक काजल फापाळे , प्राध्यापक सिद्धेश पानसरे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कार्यशाळेमध्ये पवार यांनी तंत्रज्ञानाने झपाट्याने बदलत असलेल्या युगात विद्यार्थ्यांनी कोणत्या कौशल्यांचा विकास करावा , विविध उद्योग आणि नवीन व्यवसायामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या संधी कशा साधाव्या तसेच आत्मविश्वास व योग्य दिशेने प्रयत्न कसे करावे यावर सखोल माहिती दिली . यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व कार्यशाळेमधून खूप प्रेरणा मिळाल्याचे मत व्यक्त केले . कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी संघाने विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन हेमर्षी महाले या विद्यार्थिनीने केले .


No comments