web-banner-lshep2024

Breaking News

Red Chilly News Murbad : मुरबाड बाजारपेठेत लाल मिरचीचा उतरला ठसका;परिसरात ठसक्यामुळे नागरिक बेहाल..!

गौरव शेलार / मुरबाड : नव्या हंगामातील सुरू झालेली आवक यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत लाल मिरची मोठया प्रमाणात उपलब्ध झाली आहे.मात्र याच लाल मिरचीचा ठसका आता मुरबाडच्या बाजारपेठेत उतरला आहे.मुरबाड मुख्य बाजारपेठा व मच्छी मार्केट येथील व्यापारी यांनी विक्रीस लावलेल्या लाल मिर्चीचा ठसका परिसरातील केस कर्तनालय सह इतर व्यवसायीकांना घातक ठरत असल्याची वृत्त आहे.

    रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या पोत्यातील मिर्चीचा ठसका हा शरीराला घातक ठरत असून हवेच्या दिशेप्रमाणे मिर्चीच्या ठसक्याचा लोळ  परिसरात पसरत असल्याचे येथील व्यापारील यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

------------------------------------------------------------

     मी केस कापताना दाडी करताना याच मिरचीचा ठसका मला येतो ग्राहकांना येतो कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये हातात वस्त्रा कैची असते त्यावेळी सावधगिरी बाळगावी लागते दुकानदारांना दुकान असून सुध्दा रस्त्यावरच हे मिरचीचे पोते ठेवण्यात आले आहे.मी आरोग्य सभापती,प्रभाग नगरसेवक,नगरपंचायत यांना सदरील घटनेची बाब वेळोवेळी लक्षात करून दिली मात्र त्यावर लक्ष दयाला त्यांना वेळ नाही

                                                                                                               हर्षद वाघमारे
               केस कर्तनालय व्यवसायिक,मुरबाड


No comments