मुरबाडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्याची वकिलाना अरेरावी माहिती अधिकारातील माहिती देण्यास मज्जाव अधिवेशनात प्रश्न उपस्थित होणार...!
गौरव शेलार/ मुरबाड : सध्या महाराष्ट्रात तुकडा बंदी
असल्याचे दिसत आहे त्यामुळे घरातील घरात वाद-विवाद निर्माण होत असल्याचे
दिसून येत आहे.मात्र मुरबाड तालुक्यात तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक
कार्यालयात तुकडा बंदीची पायमल्ली झाल्याचे समजत आहे.तालुक्यातील अँड.किरण
थोरात यांनी माहिती अधिकारा खाली 10 गुंठ्याचा रजिस्टर झाला आहे काय अशी
माहिती मागितली असता माहिती न देता तुम्ही 5 रुपयाचा तिकीट लावला असून
किमान 10 रुपयाचा तिकीट हवा होता असे पळवाट कारणे सांगून अर्ज निकाली
काढल्याची बाबा समोर येत आहे.
सदरील कार्यालयात अधिकारी हे पैसे घेऊन 10
गुंठ्याच्या आतील रजिस्टर करून देत असून महसूल खात्याचा लाखोंचा महसूल
आपल्या खिशात पाडत आहेत.जर हे अधिकारी भ्रष्टाचारी विरोधी असते तर आम्हाला
माहिती मिळाली असती मात्र हेच अधिकारी माहिती अधिकाराखाली माहिती देत नाही
म्हणजे कुठे तरी पाणी मूरतोय अशी शंका निर्माण होत असल्याचे अँड. किरण
थोरात यांनी व्यक्त केली आहे.माहिती अधिकाराखाली माहिती अर्ज निकाली का
काढला विचारणा केली असता " तू दहा रुपयाचा जरी तिकीट लाऊन माहिती मागितली
तरी तुला माहिती देणार नाही जा तुला काय करायचे ते कर" असे अरेरावी
करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यावर
मुरबाड तहसीलदार यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.सध्या
राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे राज्यातील होणाऱ्या
घटनाक्रम,भ्रष्टाचार यावर आवाज उठवण्याच काम विरोधी पक्ष करत आहे त्यांनी
मुरबाडच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचा भ्रष्टाचार तारांकित प्रश्न उपस्थित
करावा व सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी अँड किरण थोरात यांनी केली
आहे.



No comments