web-banner-lshep2024

Breaking News

नेवाळपाड्या मधील १५० वर्ष जुना ऐतिहासिक झुंजारराव वाडा जळून खाक..!

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या सरळगाव जवळील नेवाळपाड्यातील १५० वर्ष जुना ऐतिहासिक झुंजारराव वाड्याला आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली.  प्रचंड प्रमाणात लागलेल्या आगीत या वाड्यातील ऐतिहासिक वस्तू,  किंमती दस्तावेज जळून खाक झाले.

झुंजारराव कुटुंबाच्या मालकीच्या या वाड्यात सद्या कोणी राहत नसल्याने मोठी हानी टळली मात्र ऐतिहासिक वारसा असलेला वाडा आगीच्या भक्षस्थानी पडला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय. आगीचे नेमके कारण समजले नसून वनव्या मुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.

No comments