web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड एसटी आगारामधील प्रवाशी सुरक्षा वाऱ्यावर सोयी सुविधा अभाव..!

नामदेव शेलार / मुरबाड : गेली कित्येक वर्ष मुरबाड एसटी बस आगार नशाखोर चोरट्यांचा अड्डा बनला असून तेथे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडले आहे. मुरबाड एसटी डेपोतील अर्धा भाग भंगार बसेस दुरुस्ती वर्कशॉप ने व्यापलेला असून प्रवाशांना कोणत्याही सुविधा नसलेला जीर्ण झालेला आरसीसी शेड मोडकळीस आला आहे. एसटी बस आगारांमधील कॅन्टीन खानावळ काही वर्षापासून बंद असून प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाही पाणी शौचालय सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अभाव आहे.एसटी बस स्थानकात जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यावर सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे. 
एसटी डेपो मध्ये वाहन पार्किंग काढून असुरक्षितेचा अड्डा निर्माण करणाऱ्या एसटी डेपो आगार प्रमुख त्यांच्या वरिष्ठांवर निलंबनाची कारवाई होणे गरजेचे असल्याचे प्रवासांचे म्हणणे आहे. 
 
 गेल्या महिन्यात एका पोलिसाच्या पत्नीची वीस लाखाची सोन्याची गंठण चोरट्याने लंपास केली त्याचा तपास अद्याप लागलेला नाही जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे असते तर चोरटे पकडले गेले असते परंतु मुरबाडचा एसटी डेपो असुरक्षितेचा आगार बनला आहे. रात्रीच्या वेळी कोण येतंय कोण बसतय झोपतोय काय प्रकार घडतात त्यावर नजर ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आहे.
 
 राजकीय समर्थक वावरणारे काही कर्मचारी अधिकारी मुरबाड एसटी डेपो मधील ठेकेदारी भंगार अन्य कामे करत असल्याची चर्चा असून प्रवाशांना जुन्याच गाड्यांमध्ये प्रवास करावा लागतो त्यामुळे अपघात घडतात मुरबाड कल्याण प्रवासांना जाण्या येण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध नसतात प्रवासांचे हाल होतात कल्याण वरून येणारे प्रवासी खाजगी वाहनांना भरमसाठ पैसे देऊन येतात त्यासाठी परिवहन मंत्री,पालकमंत्री कधी मुरबाडच्या प्रवाशांना दिलासा देणार अशी विनवणी केली जात आहे.

No comments