मुरबाड पोलीस वसाहत इमारतीवरून उडी मारून पोलीस हवालदाराची आत्महत्या कारण गुलदस्त्यात..!
नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड पोलीस ठाण्याच्या इमारती
छतावरून उडी घेऊन एका 45 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची
घटना मुरबाड मध्ये घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आठ
डिसेंबरच्या रात्रपाळी कामावर पोलीस ठाण्यात असताना सदरची घटना घडली आहे
रात्री अकराच्या सुमारास सदर घटना घडल्याचे सांगण्यात येत असून पोलीस
कर्मचारी नामदेव मुरलीधर चारसकर असे त्याचे नाव आहे.
चार महिन्यापूर्वी
मुरबाड पोलीस ठाण्यात हजर झालेले तारस्कर ऑन ड्युटी आत्महत्या करतात याचे
कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे मुरबाड पोलिसांनी जखमी नामदेव चारस्कर
यांना मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यापूर्वी
त्यांची प्राणज्योत माळवली होती अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मुरबाड
पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस प्रभारी अधिकारी असे गुन्ह्याचा तपास
करून सतर्क राहतात पोलीस अधीक्षक गुन्हा घडल्यावर तात्काळ घटनास्थळी येऊन
पोलिसांना मार्गदर्शन करतात परंतु त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यानी आत्महत्या
पोलीस ठाण्यात का केली त्याची आत्महत्या वाचवण्यासाठी वरिष्ठांचे
मार्गदर्शन अपुरे पडले असावे अशी चर्चा जनमानसात केली जात आहे.
नुकत्याच
निवडणुका पार पडले आहेत विविध सण कामांचा ताण अशा मानसिकतेत नामदेव
चारस्कर होते की वैयक्तिक मानसिकतेने त्यांनी आत्महत्या केली असावी याबद्दल
कोणत्याही प्रकारे माहिती अद्याप समोर आलेली नसून नव्या सरकारच्या
गृहमंत्री वाटपा अगोदरच एका पोलिसानी पोलीस ठाण्यातच ऑन ड्युटी आत्महत्या
केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
No comments