web-banner-lshep2024

Breaking News

मतदानाची गोपनियता भंग केल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

गौरव शेलार / मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश अशोक शिंदे  यांनी 231-आष्टी विधानसभा मतदार संघ, जिल्हा बीड या मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केलं होते.

मत नोंदवल्यानंतर नोंदवल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे कायदेशीर आदेशाची अवज्ञा केली. तसेच मतदानाची गोपनियता भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती 185 मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली.

मलबार हिल मतदारसंघात विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नीरोड मुंबई  येथे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानासाठी फॅसिलिटेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरमधील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सदर घटना घडली आहे.

No comments