web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मतदार संघात मतदार स्थिर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची फडफड राजा-मामाची चिंधीगिरी अदृश्य शक्तीची हेराफेरी..!

नामदेव शेलार/ मुरबाड : विधानसभेच्या निवडणुकीचे वारे महाराष्ट्रातून सर्वत्र वाहत असल्याने मतदारांसमोर पर्याय निर्माण झाले आहेत स्थानिक पातळीवर पाच वर्षांमधील विविध कामे करणाऱ्या कार्यकर्ते पत्रकार यांचा निकष लावून मतदार स्थिर झाले आहेत. 
 
निवडणुका दर पाच वर्षांनी येतात खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सरपंच या निवडणुका 100, 200, 500 पासून दहा हजार एक मताला अशी सवयी लावणारी भुरीमंडळी हातपाय जोडून भात झोडून घेणाऱ्यांच्या खल्यावर फेऱ्या मारत आहेत. निवडणुका आल्यावर कार्यकर्त्यांची फडफड असते आणि उमेदवार निवडून आल्यावर ठेकेदारीची धडपड असते अशा राजकारणाची पंचवार्षिक निवडणूक म्हणजे तोळामोलाची..!
 
मुरबाड विधानसभा मतदारसंघात उमेदवार नेत्यांवर मतदार सामान्य नागरिकांची नाराजी नाही परंतु त्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या ठेकेदारावर अनेक ठिकाणी मतदारांनी नाराजी व्यक्त केली प्रचारात गाड्या माणसं लागतात गाव शहर वाड्यामधील पोर लागतात त्यांच्या लावाजावाने प्रचारात रंगत भरते ह्या प्रत्येक निवडणुकापूर्वी सारख्या राहिल्या नाहीत त्यांना प्रचार प्रवासासह मतदान काढण्यापर्यंत खर्चाचे अमिष दाखवलं जातो काही तर खाऊपियो मजा करो असेही वावरतात म्हणजे एक पंधरवाडा कार्यकर्ता रिचार्ज असतो पण राजा -मामाची चिरीमिरी पाकिटे आणि थकलेला गाड्यांचा भाडा कधी कधी नाराजी शेवटची संधी गमावून बसतो अशी ही निवडणूक अटीतटीची सुरू आहे. 
 
ज्याच्या हातात ससा तोच पारधी या म्हणीचा तंतोतंत अनुभव निवडणुकीत अनेकांना आला आहे मतदारांच्या नावाने कार्यकर्त्यांकडे दिलेला पाकीट पोहोचत नाही तेव्हा झालेला बदल लक्षात येताना वेळ निघून गेलेली असते मात्र सच्चा मतदार स्थिर असतो त्याचं मतदान योग्य वेळी योग्य उमेदवाराला होतोच अशा निवडणुकीचा प्रचार अंदाज नमो दाहो दंशी असाच आहे. 
 
गेल्या लोकसभेला अदृश्य शक्तीचा अनुभव ताजा असताना विधानसभेला अदृश्य शक्ती सर्वत्र काम करताना दिसत आहे उमेदवाराच्या नियोजना अभावी अनेक ठिकाणी उमेदवारांना फटका बसतो त्यांचा आढावा घेताना विश्वास जाग्यावरच थांबतो कोणी काय केलं याचा जाब मतदान विचारत असताना उमेदवारांची बाजू स्पष्टपणे मांडणारे वक्ते मीडियातून कमी पडतात मात्र ज्यांच्या हातात वार्ड सोसायटीचे वाटप असतो त्यांच्या डोक्यात हवा वेगळीच असते प्रत्येक कार्यकर्ता मतदाराला मोजण्याचा प्रयत्न राजा-मामा करतात हाच फटका अपेक्षा हित आहे असे जाणकारांचे मत आहे पण मतदार स्वावलंबी स्वाभिमानी मताशी एकनिष्ठ असल्याने आपलं हक्क योग्य ठिकाणी बजावतात.

No comments