पुढे 50 वर्ष तुम्हा सामान्यांना वेदना भोगायच्या आहेत आत्ताची पाच वर्ष तरी सुखाचा लाभ घ्या आमदार किसन कथोरे यांचे नेतृत्व टिकवा..!
नामदेव शेलार / मुरबाड : स्वातंत्र्याच्या 76 वर्षांमधील
2009 पासूनचा पंधरा वर्षाचा काळ मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन
कथोरे यांच्या नेतृत्वाखाली विकास पर्व सुख समाधानाने गेला या पुढची पन्नास
वर्षे तुम्हा सर्वसामान्यांना वेदना सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो अशा
भावना मुरबाड विधानसभा क्षेत्र विकास मंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा
ज्योती शेलार यांनी व्यक्त केल्या आहेत.
गेली पंधरा
वर्षात मुरबाड विधानसभा मतदारसंघातील परिपूर्ण विकास झाला आहे दहशत
दादागिरीचे दबाव तंत्राचे राजकारण संपवले आहे प्रत्येक समाजाला न्यायिक
भूमिकेत माणूस म्हणून जगण्याचा मार्ग सुकर करून दिला अशा विकासाचे महामेरू
आमदार किसन कथोरे यांना पुढील पाच वर्षे आपले नेतृत्व करण्याची संधी आपण
सर्वांनी द्यावी यासाठी जेष्ठ कार्यकर्त्यांनी तरुण-तरुणींना प्रचार रॅलीत
अहवान केले.
विकास म्हणजे काय गरजा कोणत्या समस्या
गंभीर,कशा,अपेक्षा पूर्ण किती,समाज नेतृत्व आपला आपणच संपवलं तर समाजाचा
आधारस्तंभ कोणता त्यासाठी कोणाचे इशाऱ्याने काम करायचे आज याच्याबरोबर
उद्या त्याच्यासोबत राहणार आहात काय? राजकारणापेक्षा समाजकारण करता करता
आपल्या वयाचे वजन किती वाढले कोण बघणार उद्याच्या 25 वर्षात आमदार आणि
ज्यांनी स्वातंत्र्यापासून 76 वर्ष राजकारणात घालवली त्यांची स्थिती काय या
सगळ्याचा विचार करण्याची वेळ विधानसभेच्या निवडणुकीत आली आहे अशा भावनाने
मतदारांनी आमदार किसन कथोरे यांच्या प्रचार सभांना बैठकींना पाठिंबा दिला.
येत्या
निवडणुकीत अभी नही तो कभी नही आता बदल हवा पंधरा वर्षात काय विकास केला ही
निवडणूक शेवटची अशा अनेक घोषणा आरोपांची मायादळी पाहण्यास मिळाली मात्र
त्याची उत्तरे प्रत्येक मतदारांकडे आहेत असे गावोगावी मतदारांकडून
प्रतिक्रिया उमटल्या आहेत नेत्यांवर नाराजी नाहीत पण त्यांनी पुढे केलेल्या
ठेकेदार आणि काही ठराविक पदाधिकारी कार्यकर्त्यांवर लोकांची तीव्र नाराजी
आहेच..!याचं बघून तो करतो यालाच राजकारणात कॉपीफुल
म्हणतात स्थानिकांच्या डोक्यावर परका बसवतात त्यातून नाराजीचा सूर उमटत आहे
मात्र नेत्यांच्या आपुलकीचं नातं प्रचारात दोन्हीही बाजूच्या नेत्यांचा
समाधान करतात अशी प्रचार स्थिती आणि उपस्थिती पाहण्यास मिळत आहे.
मुरबाड
विधानसभेत माजी आमदारपुत्र विरोधात आजी आमदार नव्हे तर आजी आमदार विरुद्ध
माजी आमदार अशी असून माजी खासदार विरुद्ध आजी खासदार अशीच वाटत असली तरी
मुरबाड विधानसभेत अदृश्य शक्ती काम करत असल्याची चर्चा आहे. राजकीय
पक्षांची ताकद वाकायला लावते आजचा विरोधक उद्याचा प्रचारक असू शकतो आदेशाचा
पालन मदतीची गाळण करून जाते असाच प्रकार मुरबाड विधानसभेत दिसून
येतो,गेल्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार बाल्या मामा म्हात्रे यांना
पराभूत करण्यासाठी जीवाचे रान केले त्याच राष्ट्रवादीचे उमेदवार सुभाष पवार
यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करावा लागत आहे आणि भाजपा शिवसेना सत्तेत
असलेले सुभाष पवार निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनाच विचारतात तुम्ही विकास काय
केला यामधून मतदारात संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या
पंधरा वर्षात आमदार किसन कथोरे यांनी मुरबाडचा चेहरा मोहरा बदलला मुरबाड
बाजारपेठ सुसज्ज केली रस्ते पतदिव्य गटारी सौचालय दळणवळण साधने सुरळीत केली
देशाशी राज्याशी संपर्क होणारे राष्ट्रीय महामार्ग बनविले उद्योग
व्यवसायात भर टाकली माळशेज घाट पर्यटन स्थळ देशाच्या नकाशावर नेले पाणी बीच
योजना दिल्या पूल साकव गावोगावी कॉंक्रेटि रस्ते केले आदिवासींना घरकुले
दिली आरोग्य रुग्णालय सुसज्य करून त्यामध्ये सुईसुविधा दिल्या गावातील
भांडण मिटवली दहशतमुक्त मुरबाड विधानसभा करून उच्च शिक्षण रोजगाराच्या
साधने उभी करून हजारो तरुणांना तरुणींना नोकऱ्या दिल्या भ्रष्टाचाऱ्यांना
दलालांना बाजूला केले लाडक्या बहिणींना शासनाच्या योजनेचा निधी मिळवून दिला
शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ दिला धार्मिक स्थळे मंदिरे पर्यटन
स्थळांचा विकास केला हे आमदार किसन कथोरे विकासाचे पर्व पुरावा प्रचारात
देत आहेत.
मात्र पुढच्या पाच वर्षात मुरबाडचा आमदार
कोण होणार याकडे लक्ष वेधत नाहीत परंतु मतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही
माझा श्वास असेपर्यंत मुरबाड विधानसभा मतदारसंघातील सर्व जातीधर्म
पंथांच्या विकास सुरक्षा रक्षणासाठी कार्यरत राहील पुढील पाच वर्षात तुमचा
पन्नास वर्षाचा विकास कोरुन ठेवेल असे अभिवाचन आमदार किसन कथोरे यांनी
प्रचार सभा बैठकीत मतदारांना दिले आहे.
No comments