मुरबाड विधानसभेतील बदलापूरची मतदार संख्या वाढली भाजपाच्या आमदार किसन कथोरे यांच्याशी सुभाष पवार यांची स्पीड स्पर्धा तुटली पुन्हा कथोरे यांना संधी?
नामदेव शेलार / मुरबाड : गेली पंधरा वर्षे मुरबाडचे आमदार
किसन कथोरे यांनी प्रत्येक वेळी विक्रमी मताधिक्य घेऊन शिवसेना राष्ट्रवादी
अपक्ष अशा बलाढ्य उमेदवारांना पराभूत केले त्याच मतदारसंघात यावेळी आमदार
किसन कथोरे यांच्या विरोधात शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार सुभाष पवार लढत
देत आहेत. नुकत्याच सुभाष पवार यांनी शक्ती
प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला त्या सभेत त्यांनी स्पीडने निवडून येणार
अशी स्वतःच घोषणा केली मात्र 2009 पासून 2019 पर्यंत मुरबाड विधानसभा
मतदारसंघातील पक्षाचे प्रमुख नेते वामन म्हात्रे माजी आमदार गोटीराम पवार
प्रमोद हिंदुराव यांना 40,000 मताधिक्यापर्यंतच रोखून किसन कथोरे तीन वेळा
आमदार झाले या मतदारसंघात 3 लाखाची मतदार संख्या यावेळी 4 लाख 70 हजाराच्या
वर गेलेली आहे परंतु विजयाचा गणित बदलापूर अंबरनाथ ग्रामीण मध्ये आहे
कल्याण ग्रामीण मुरबाड तालुक्याचा एकत्रित मतदान संख्या 2 लाख 15 हजाराच्या
आसपास असून बदलापूर अंबरनाथ ग्रामीणची संख्या 2 लाख 70 हजाराच्या आसपास
असल्याने विजयाची संधी बदलापूर मधून आहे.
जसं माजी
आमदार गोटीराम पवार यांना मानणारा ज्येष्ठ वर्ग तरुण वर्ग मुरबाड मध्ये आहे
कार्यकर्ता लॉगिन आहे तसाच कार्यकर्ता जेष्ठ नागरिक युवक वर्ग बदलापूर
मध्ये आमदार किसन कथोरे यांचा आहे बदलापूर अंबरनाथ मध्ये सुभाष पवार
गोटीराम पवार यांचा स्वतःचा कार्यकर्ता वर्ग नाही परंतु आमदार किसन कथोरे
यांचा मुरबाड मध्ये कार्यकर्ता जेष्ठ युवक वर्ग असून त्यांची नाळ समाजासह
अन्य सर्व समाजातील घटकांशी जुळलेली आहे आमदार किसन कथोरे डॅशिंग नेते
मानले जातात त्यांची प्रशासनावर पकड आहे शिवाय ठाणे कोकणाचा स्वर्गीय
शांताराम घोलप यांच्यानंतर आमदार किसन कथोरे एकमेव धाडसी कुणबी नेतृत्व
मानले जातात.निवडणुका येतात जातात यापुढेही जिल्हा
परिषद बँका अन्य निवडणुका आहेत तेथे सुभाष पवार यांना संधी मिळू शकते मात्र
आमदार किसन कथोरे पुना मागे जाणारे नेतृत्व नसल्याने सर्व समाजाच्या
नेतृत्व मतदारात किसन कथोरे यांना प्रतिसाद मिळत आहे तसही बदलापूरच्या
मतदारसंघाने आमदार किसन कथोरे यांना बहुमताचा आकडा गाठता येईल या भूमिकेत
मतदार कथोरे यांना सोडून नव्या पक्षाकडे पर्वाकडे नेतृत्वाकडे जाण्यास
उत्सुक नाही असेच चित्र मतदार संघात निर्माण झाले आहे.
ठेकेदारी
आणि मक्तेदारी हा आरोप प्रत्यारोपाचा भाग झाला जेव्हा दोघेही एकाच
सरकारमधील सत्तेत होते तेव्हा आठवलं नाही तेव्हा साठवलं आणि आता मतदारांना
उठवण्याचं काम केला जातो तेव्हा पंधरा वर्षाच्या जडणघडण विकास आणि ठेकेदारी
समर्थक यांची बेरीज वजाबाकी केली जाते पंधरा वर्षात स्वतःचे समर्थक सोडून
नवीन जुने सामाजिक विरोधक किती आपलंसं केलं त्यांना काय मदत केली हेच मतदार
या निवडणुकीत विचारत आहेत मात्र त्यावर आमदार किसन कथोरे यांनी सांगितले
माझ्या पंधरा वर्षात ज्यांच्या समस्या कामे त्यांच्याशी थेट भेटलो त्यांची
कामे केली दलाल ठेकेदारांना बाजूला केले विकासाबरोबर गावात शहरात एकोबा
शांतता ठेवली टीकाटिपणी करणारे आहेत त्यांना कोणी वाव देत नाहीत त्यांच्या
मागे कोणी नाही असे करतात मात्र माझं पंधरा वर्षापासून त्यांनाही अहवान आहे
सगळेच एकत्र या सामाजिक विकासित काम करा या भूमिकेने किसन कथोरे मतदारांना
साद घालत आहेत.
No comments