web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करून सुभाष पवार यांचा शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी अर्ज भरला;सोबत खासदार बाल्यामामा म्हात्रे..!

नामदेव शेलार / मुरबाड : प्रचंड नागरिक कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनाने शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे मुरबाड विधानसभा उमेदवार सुभाष पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत अर्ज भरण्यासाठी सुरेश (बाल्यामामा)म्हात्रे यांनी उपस्थिती दाखवली.मुरबाड कुणबी समाज हॉल पासून मुरबाड बाजारपेठेतून माता नगर पटांगणात जाहीर सभा घेऊन तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला व्यासपीठावर बदलापूर कल्याण ग्रामीण मुरबाड मधील कार्यकर्ते उपस्थित होते व्यासपीठावरून सुभाष पवार यांनी भाजपा आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले. 
 
 माजी आमदार गोटीराम पवार यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघात नवीन चेहरा दिला आहे यावेळी माजी आमदारांनी मागील सरकारवर आरोप केले 35 हजार शिक्षकांची भरती करणारी घोषणा हवेत विरली बेरोजगारी वाढली आता रिटायर शिक्षकांची भरती करून डीएड बीएड शिक्षण घेणाऱ्यांना बेरोजगार केले असेही माजी आमदार गोटीराम पवार म्हणाले. 
2009 च्या निवडणुकीत माझा तीन चार हजाराने पराभव झाला आहे आत्ताचे चित्र वेगळे आहे माझ्या सभेला जेवढी गर्दी झाली नाही त्यापेक्षा सुभाष पवार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याला गर्दी झाली आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार परिवर्तन करा असेही माजी आमदार गोटीराम पवार यांनी सांगितले. मी कोणाच्या रॅली ची तुलना करणार नाही परंतु सुभाष पवार यांचा अर्ज भरायला मतदारसंघातील कार्यकर्ते मतदार उपस्थित होते असे सांगून रॅली मोठी असली तरी पुलिंग महत्त्वाची आहे असे पवार म्हणाले याच मैदानात जागेवर भाजपाच्या उमेदवारांची सभा पार पडली आहे आणि माझे अर्ज भरण्यासाठी सभा संपन्न झाली यामध्ये पत्रकारांनी चांगले असेल तेच दाखवावे असे अहवान पत्रकारांना सुभाष पवार यांनी केले आहे. 
 
 लोकांच्या आग्रहाने निवडणूक लढत आहे बदलापुरात मतदारांची ताकद वाढली आहे मतदारसंघातील प्रलंबित सर्व समस्या सोडवणार असल्याचे सांगून आरोग्य योजना बेरोजगारी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असे सुभाष पवार यांनी सांगितले राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश (बाल्यामामा) म्हात्रे यांनी सुभाष पवार यांना विजयाच्या शुभेच्छा देताना जसा खासदार निवडून आणला तसाच आमदार निवडून हाणा असे आवाहन केले गेल्या लोकसभेत ज्या बाल्यामामा विरोधात सुभाष पवार यांनी भाजपा खासदारांचे काम केले त्याच सुभाष पवार यांना खासदार बाल्यामामा म्हात्रे कसा मदतीचा हात देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

No comments