मुरबाड विधानसभा मतदार संघात पॉकेट मारीचा सुळसुळाट;सभा, मेळावे मध्ये मतदारात वेट अँड वॉचच्या भूमिकेत ''चाय पे वार्ता धाबे पे चर्चा''..!
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघात
उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज मिळावे शिबिरे रॅली पत्रकार परिषदा सभा या
कार्यक्रमात पॉकेटमारांचा सुळसुळाट झाला असून काही कार्यकर्ते नागरिकांचे
पत्रकारांचे पॉकेट मोबाईलवर डल्ला मारला आहे. सभा
रॅली निवडणुका विजयी मिरवणुका अन्य कार्यक्रमात असणाऱ्या भरगच्च गर्दीचा
फायदा घेऊन पाकीट मार हात साफ करून घेतात तसेच पत्रकार परिषदांमध्ये पॉकेट
मारी होते गर्दीचा फायदा घेणारे कधी पत्रकारांच्या कक्षात घुसतात कधी सभा
रॅली मिरवणुका मेळाव्यात घुसतात त्यामुळे कार्यकर्ते पत्रकार नागरिकांमध्ये
चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे छोटे मोठे गोष्टी असल्याने अनेक वेळा
कोणीही पोलिसात तक्रार करत नाहीत.
24 ऑक्टोंबर 2024
ला आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या जाहीर सभा रॅली
पत्रकार संवाद यावेळी सुरेश विशे भाजपा नेते यांचा मोबाईल चोरीला गेला तर
काही पत्रकारांचे पाकीट चोरल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. विधानसभा
निवडणुकीत सर्वत्र प्रतिस्पर्धी एकमेकांवर आरोप करून निवडणुकीचा कालावधी
गोडी गुलाबी ने उरकून घेत आहेत गेल्या चार वर्षात आपला ठेकेदार आपला समर्थक
जोपासलेला सुद्धा हात जोडून वेळ निभावून घेत आहे पुन्हा पाच वर्ष तिसऱ्या
डोळ्यासमोर विरोधक मदत न करण्याचा राग धरून वचपा काढतात या भीतीने गेली दोन
शतके भोगलेल्या मतदारांनी दादा बाबांना हात जोडून वेट अँड वॉच ची भूमिका
साकारली आहे.
विधानसभा निवडणुकीत चहा पे चर्चा आणि
धाबे पे वार्ता अशी खिल्ली उडवली जात आहे मात्र पाकिटातील हजारात येईल तो
आपला कार्यकर्ता अशा भावनेत पुढारपणाचा देखावा उभा राहिला आहे. मुरबाड
विधानसभा मतदारसंघात होणारे मेळावे सभा रॅलीसाठी मजूर नाक्यावरील नागरिक
कामगारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्यामुळे भात शेती कापणी
जोडणी बांधकाम मजूर छोट्या छोट्या कामांसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली
आहे.विधानसभा निवडणुकीत जेवढा दावा तेवढी दवा
याप्रमाणे पॉकिटात मनी तेवढीच कहानी बाकी क्रमश अशा दे दान सुट्टे ग्राहण
या वक्तव्याची अधिक चर्चा रंगली आहे दररोज रंगणारे मथळे स्टोऱ्या थंडावल्या
असून फुकटात अद्याप किती देऊ अशी चर्चा सुरू आहे.
No comments