आतकोली पठारावरील ठाणे महानगरपालिकेचे कचरा डेपो हटाव मोहिमेसाठी कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांचा पुढाकार पंचकोशीतील गावकऱ्यांच्या सोबत महाआंदोलन छेडणार असल्याचा इशारा...!
भिवंडी/ठाणे : शेकडो वर्षापासून सहा सात गावांमधील हजारो गाय म्हशी बैलांना उन्हाळी पावसाळी चारा उपलब्ध विश्रांतीसाठी ग्रामपंचायतला मालकी दिलेल्या शासकीय गुरुचरण जागेतठाणे महानगरपालिकेने कचरा डेपो सुरू केला आहे.
कचरा डेपोला स्थानिक रहिवासी शेतकरी व्यावसायिक लहान मुले महिला वृद्ध तरुणांनी तीव्र विरोध केला असून शासनाने आतकोली तळवली पठारावरील कचरा डेपो प्रोजेक्टचा गाशा गुंडाळून स्थानिक ग्रामपंचायतींच्या ताब्यात जमिनीचा ताबा द्यावा अन्यथा पंचक्रोशीतील शेतकरी गावकरी आत्मदहन आंदोलन करतील असा इशारा शासनाच्या सर्व संबंधित विभागांना लेखी निवेदनाद्वारे शेतकरी आंदोलक नामदेव शेलार यांनी या पूर्वीचदिले आहे.
आतकोली कचरा डेपोला स्थानिक शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असल्याने राज्याचे मुख्यमंत्री यांनी तळवली पडघा रस्त्यावरील खड्डे पाहण्याच्या बहाने आतकोली पठारावरील कचरा डेपोची छुपी पाहणी केल्याचे बोलले जाते मात्र मुख्यमंत्र्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना न्याय दिला नाही ठाणे महानगरपालिका कचरा डेपो चा काम बंद केला नसल्याने गावकऱ्यांनी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांना साथ घातली आहे वाशेरे आमने चिराड पाडा, आतकोली, तळवली, सापे, अर्जुनली, भादाने पडघा चिंबीपाडा ,शेरेकरपाडा, जुपाडा सावद,खांडवळ सह अनेक गावांना आरोग्यास धोकादायक असणारा ठाणे महानगरपालिकेच्या कचरा डेपो च्या जागेची प्रत्यक्ष पाहणी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांसोबत घटनास्थळाची पाहणी केली परिसरामधील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची कृती समिती बनवून तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय शेकडो शेतकरी गावकऱ्यांसमवेत सर्वानुमते घेण्यात आला आहे.
शेतकरी ग्रामस्थ महिला युवक वृद्ध शालेय विद्यार्थी सर्वच मोर्चात सहभागी होणार आहेत उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी ठाणे महानगरपालिका आयुक्त तहसीलदार यांना घेरावा आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रात जाणारे समृद्धी महामार्ग नाशिक मुंबई हायवे रस्त्यावर आंदोलनाची लोन पसरणार आहे.
मुंबईला येथूनच पाणीपुरवठा होत आहे वीज पुरवठा होत आहे आमच्या भावना शासनाने लक्षात घ्याव्यात आमची जमीन मालमत्ता घेऊन आम्हाला रोगराईने मृत्यू येत असेल मुलबाळ गुरे ढोरे घेऊन गाव सोडावं लागत असताना आम्ही जगण्यात अर्थ काय असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी एक निर्णयाने महाबैठकीत केले आहे.
कचरा डेपो 60 किलोमीटर अंतरावर दुसऱ्या तालुक्यातील ग्रामीण विकास विभागात कशासाठी ग्रामीण भागात माणसं राहत नाहीत काय? ठाणे मुख्यमंत्र्यांचे गाव आहे परंतु परिसरात मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेचे छत्र आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी न्यायदेवता बनावे अशी विनवणी स्थानिक लोकांनी केली आहे.
येथील कचरा डेपो प्रकल्प लगत गोडाऊन असून तेथे हजारो कामगार काम करतात तेथील उद्योग बंद पडणार आहेत शेतीवर रोगराई पसरणार असून पाणी दूषित होणार आहे माणसांना विविध रोगराई होऊन पटकी सारखी माणसं सरकार मारणार असेल तर संघर्ष करताना आमचा बळी शासनाने घेतल्यास आम्हाला अभिमान आहे. कुणबी सेनेचा विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची सयुक्त संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारले आहे आतकोली येथे शेतकऱ्यांची भव्य बेठक पार पडली यावेळी स्थानिक नेते रमेश शेलार विलास भोईर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते घटनास्थळी पाहणी दौऱ्यात शेकडो सामाजिक राजकीय नेते विश्वनाथ पाटील यांच्या सोबत हजर होते.
No comments