web-banner-lshep2024

Breaking News

श्रमजीवी संघटनेचा 23 सप्टेंबरला पंचायत समिती कार्यालय समोर आदिवासींचा बेमुदत निर्णायक आंदोलन...!

नामदेव शेलार/ मुरबाड : श्रमजीवी संघटना महाराष्ट्राचे नेते विवेक भाऊ पंडित यांच्या संघटनेच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुरबाड पंचायत समिती कार्यालय समोर आदिवासींचा बेमुदत निर्णायक आंदोलन 23 सप्टेंबर पासून करण्यात येणार आहे .

   या बेमुदत निर्णायक आंदोलनाचे मुद्दे वन हक्क कायद्यामधील कलम 3 (2) प्रमाणे जिल्ह्यात दिनांक 2 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे गावठाण विस्तार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, प्रलंबित वन हक्क दाव्याची व अपिलांची पूर्तता करून पट्टे देण्यात यावे, जल जीवन मिशनच्या कामांची चौकशी करून कामातील भ्रष्टाचारांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे, शासनाच्या धोरणाप्रमाणे हर घर नळ से जल देण्यात यावा, जिल्ह्यातील आदिवासी शासकीय आश्रम शाळेमध्ये वस्तीगृहाची क्षमता वाढवून पुरेशी कर्मचारी व सुविधा पुरविण्यात याव्यात, सप्तसुत्री कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, मुरबाड शहरांमधील अंगणवाडी सेविकेच्या मृत्यूची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल तात्काळ करावे, मुरबाड पंचायत समितीकडून शहरांमधील अंगणवाड्या मुरबाड पंचायत कडे वर्ग करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी त्याच अंगणवाडी सेविकेच्या नातेवाईकाला भरपाई द्यावी, पंचायत समितीकडून शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य वस्तू वाटप लाभार्थींची यादी प्रसिद्ध करून लाभार्थींची चौकशी करावी, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या पूर्ण अपूर्ण कामाची यादी जाहीर करून आदिवासी वाड्यापाड्यांना रस्त्याच्या निधी भ्रष्टाचार करणाऱ्या वर निलंबनाची कारवाई करण्याबाबत, ग्रामपंचायत इमारतीचा अपुर्ण काम असताना निधी काढला त्याची चौकशी करून कारवार्इ करावी, रस्त्यावरील खड्डे संख्याबळ ठिकाणाची चौकशी करावी, राष्ट्रीय महामार्गाने निकृष्ट बुजवलेल्या सोनार पाडा एसटी स्टँड विद्यानगर पर्यंतच्या गटार कामाची चौकशी करून ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, आदिवासींना विनाशुल्क विद्युत मीटर बसवून द्यावेत अशा विविध मागण्या करण्यात आले आहेत.यावेळी तालुका अध्यक्ष पंकज वाघ यांनी मोर्चेची तयारी पूर्ण केली असल्याचे आमच्याशी बोलताना सांगितले.

 

No comments