Kangan Ranaut : कंगना मुंबई सोडणार? बंगला विकण्याची जोरदार चर्चा, किंमतही व्हायरल, नेमकं खरं काय?
अभिनेत्री कंगना राणावत आता खासदारही बनली आहे. काही महिन्यांपूर्वी ती लोकसभा निवडणुकीदरम्यान मंडी लोकसभा मतदारसंघातून उभी राहिली आणि निवडणूक जिंकली. त्यामुळे सध्या ती राजकारणावर फोकस करत असून त्यात व्यस्त आहे. याचदरम्यान कंगनाच्या मुंबईच्या घराबद्दल बातम्या समोर येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, कंगाना राणौत ही तिचे पाली हिलमधील घर विकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच घरात त्यांच्या, मणिकर्णिका फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसचे ऑफीसही आहे.
राजकीय जीवनावर सध्या कंगनाचा अधिक फोकस असून तिचा जास्तीत जास्त वेळ हा हिमाचल प्रदेशातील तिच्या मतदारसंघात आणि दिल्लीत जात आहे. त्यामुळेच ती मुंबईतील घर विकणार आहे, अशी चर्चा आहे.
रिपोर्ट्सनुसार, कंगना तिचे हे आलिशान घर 40 कोटी रुपयांना विकणार आहे. मात्र अद्याप याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेला नाही, त्यामुळे टीव्ही9 याची पुष्टी करत नाही. एका युट्यूब चॅनेलने असा दावा केला होता कंगनाचे घर आणि प्रॉडक्शन हाऊसची जागा विकण्यास उपलब्ध आहे. त्यांच्या या दाव्यानंतर कंगनाच्या घराबद्दल या चर्चा सुरू झाल्या.
त्या यूट्यूब चॅनेलन प्रॉडक्शन हाऊस आणि मालकाचे नाव जाहीर केले नव्हते, पण त्या व्हिडीओत वापरण्यात आलेले फोटो आणि व्ह्यू वरून हिंट मिळाली की ते ऑफीस कंगनाचेच आहे. सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी कमेंट्स करत ते घर व ऑफीस कंगनाचेच असल्याचे अंदाज व्यक्त केला.
दोन मजली आहे कंगनाचा बंगला
हा बंगला दोन मजले असून त्याची किंमत 40 कोटी रुपये आहे. मात्र तिचे घर विक्रीसाठी आहे की नाही? यावर कंगना राणौतकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या फ्लॅटची 2020 साली बीएमसकडून छाननी करण्यात आली.
बीएमसीने चालवला बुलडोझर
सप्टेंबर 2020 मध्ये, बीएमसीने बेकायदेशीर बांधकामाचा हवाला देत कंगना रणौतच्या वांद्रे येथील कार्यालयाचा-घराचा काही भाग पाडला होता. 9 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतर तोडण्याचे काम मध्यंतरी थांबवण्यात आले होते. कंगनाने बीएमसीविरुद्ध खटला दाखल केला आणि बीएमसीकडून भरपाई म्हणून २ कोटी रुपयांची मागणीही केली, परंतु मे २०२३ मध्ये तिने आपली मागणी मागे घेतली.
No comments