web-banner-lshep2024

Breaking News

ज्येष्ठ पत्रकार कैलाश म्हापदी सुधागडमित्र पुरस्काराने सन्मानित


ठाणे :  सुधागड तालुक्याच्या व तालुक्यातील रहिवाशांच्या विकासासाठी झटणारी संस्था सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे (रजि.) यांच्यावतीने रविवार 28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांचे अध्यक्षतेखाली सहयोग मंदिर, घंटाळी रोड, ठाणे संपन्न झाला. संस्थेच्यावतीने यंदा दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी यांना ‘सुधागड मित्र’ पुरस्काराने सन्मानित केले तर सुधागडातील ज्येष्ठ समाजसेवक, नाट्यलेखक आत्माराम खरीवले याना विशेष पुरस्काराने गौरविले. मास्टर ऑफ लॅण्डस्केप आर्किटेक्चर पदवीप्राप्त कु. पूर्वा दिपक दळवी व अॅडव्होकेट स्वप्नील कालेकर व डॉक्टर श्रुतिका खाडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर, सुधागडमित्र (मार्गदर्शक) विजय तांबे, सुधागड तालुका मराठा समाज कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर सर, सुधागड तालुका मराठा समाज सरचिटणीस सुजित सदाशिव बारस्कर, दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी, दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक दीपक दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

      याप्रसंगी बळीराम निंबाळकर, धनंजय साजेकर, विजय तांबे यांनी विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी दहावी, बारावी विद्यार्थाना गौरविण्यांत येऊन स्मृतिचिन्ह, दप्तर, नोटबुक आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा फोल्डर व पेन देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत (पितृछत्र हरपलेल्या व दिव्यांग) लाभार्थी विद्यार्थी व महिला याना दप्तर, नोट बुक्स व आर्थिक मदतीचे वितरण करण्यांत आले. इ. 1 ते 9 वी पास विशेष गुण संपादत विद्यार्थीना शालेय साहित्यचे बक्षिस वितरण करण्यांत आले. सत्कार व पारितोषिक वितरण, सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील 14 माध्यमिक शाळेत पितृछत्र हरपलेल्या दिव्यांग व गरीब गरजु विद्यार्थ्यांना 9 वी व 10 वी पुस्तक वाटप झाले असून वह्या वाटप व शालयेपयोगी वस्तूंचे वाटप ऑगस्ट महिन्यात करण्यांत येणार आहोत. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी मार्गदर्शन करताना हुशार विद्यार्थाना सांगितले की, सुधागड तालुक्यामध्ये युपीएससी कोणी झाले नाही तरी तुम्ही युपीएससी होण्याचे प्रयत्न करा. तुम्हाला संस्था मदत करण्यास तयार आहे. 

     तसेच संस्थेचे सभागृह ठाण्यात का असावे व त्याची समाज व विद्यार्थी विकासासाठी किती गरज आहे समजावून सांगितले त्यांस देणगीदारांनी चांगला प्रतिसाद दिला. सन 1976 साली संस्था स्थापना करणार्या सभासदांचे ऋण व्यक्त करून मागील 48 वर्ष संस्था भक्कम पायावर कशी उभी आहे याचे विवरण केले, तसेच दत्तक पालक व दिव्यांग योजनेचे देणगीदार व शैक्षणिक देणगीदार या सर्वांचे आभार मानले. शेवटी सभागृह निधीस सर्वांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले व सर्व उपस्थित मान्यवर विद्यार्थी व पालक यांचे आभार व्यक्त केले. तसेच सुधागड तालुका रहिवासी संघाच्यावतीने वधु-वर सुचक केंद्रही कार्यालयात सुरू असून सुधागड तालुक्यासह ठाणे, पुणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील बांधवांना नाव नोंंदणीसाठी आवाहन करण्यात येत आहे. 

    संस्थेचे सरचिटणीस श्री राजू पातेरे यांनी प्रताविक करताना संस्थेच्या मागील कार्याची आढावा सभागृहात सांगितला तसेच त्यांनी उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन केले त्यांस सचिव श्री अविकांत साळुंके यांनी चांगली साथ दिली. शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष शंकर काळभोर यांनी आभार मानले. संस्थेच्या वरील उपक्रमासाठी अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उपाध्यक्ष वसंत लहाने, उपाध्यक्ष शंकर काळभोर, सरचिटणीस राजू पातेरे, चिटणीस अविकांत साळुंके, खजिनदार विजय पवार, उपखजिनदार विजय जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, संपर्कप्रमुख सुनिल तिडके, अंतर्गत हिशेब तपासनीस दत्ता सागळे, सांस्कृतिक प्रमुख जनार्दन घोंगे, प्रसिद्धीप्रमुख अजय जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल सागळे, श्याम बगडे, गजानन जंगम, मोहन भोईर, भगवान तेलंगे, हरिश्चंद्र मालुसरे, अनिल चव्हाण, बबन चव्हाण, जयगणेश दळवी, प्रकास वाघमारे, दत्तात्रय दळवी, राजेश बामणे तसेच माजी अध्यक्ष व सल्लागार विठ्ठल खेरटकर, सल्लागार शिवाजी दळवी, सुधीर मांढरे, सुरेश शिंदे, रमेश सागळे, चंद्रकांत बेलोसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेतले. तसेच महिला मंडळ अध्यक्षा वैशाली खेरटकर, सरचिटणीस वीणा घाडगे यान सर्व महिला मंडळ उपस्थित होते.

No comments