गौरी गणपती उत्सव खरेदीवर पावसाचं विराजमान व्यापाऱ्यात धास्ती
नामदेव शेलार / मुरबाड : गौरी गणपती सण अवघ्या सहा दिवसांवर आला असताना भक्तगणांना सतत धार पावसामुळे उत्सवाची खरेदी करता आली नाही गौरी गणपती मखर सजावट विविध वस्तू जीवनास्तुक वस्तूची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांचा सुखसुकाट पाहण्यास मिळत आहे रस्त्यावरील खड्डे पडणारा सतत धार पाऊस बाजारपेठेत खरेदी विक्रीला कारणीभूत ठरला आहे गौरी गणपती सणासाठी सजावटीचे दुकाने सजली आहेत अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी जात असल्याने वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे.
गौरी गणपती सणासाठी विविध पदार्थ बनवण्यासाठी जीवनास्तूक वस्तूची खरेदी किराणा दुकाने मॉल मधून होते परंतु खरेदीवर पावसाचे विराजमानाने व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अनेक छोटे व्यावसायिक कर्जबाजारी होऊन सणावारात वस्तूची विक्री करण्यासाठी पुढाकार घेतात गौरी गणपती सणात अनेक विविध क्षेत्रातील व्यापारी कलावंतांची वार्षिक उदारनिर्वाची सोय होते त्यावर पावसाने झालंर घातल्याने खरेदी विक्री धारकांची गोची झाली आहे मखर सजावटीसाठी प्लास्टिकची फुले विविध वस्तू रस्त्यावर विक्री करणारे फेरीवाले पावसात फिरू शकत नाहीत मात्र वस्तू खरेदी करणाऱ्या नागरिकांनी गणपती बाप्पाचे मखर जुन्या पिढ्यान पिढ्याने चालत आलेले मखर बनवण्याला सुरुवात ग्रामीण शहरी भागात झाली आहे.
गणेश उत्सवावर रस्त्यावरील खड्डे भरण्यास संबंधित बांधकाम विभागांना अपयश आले आहे. गणेशोत्सवामध्ये विद्युत पुरवठा खंडित होऊ नये अन्यथा नागरिक रस्त्यावर येतील असा इशारा रहिवासींनी दिला आहे गौरी गणपती सणासाठी फुले भाजीपाला यांची दररोज खरेदी विक्री होते मात्र सजावटीच्या वस्तू एकाच वेळी खरेदी होतात बाजारात ग्राहकांची मंदी असल्यामुळे खरेदी केलेला मालाची विक्री होण्याचे दिवस संपत चालले आहेत एका वस्तू मागे दहा ते पन्नास रुपये कमाई असते त्यामधून दुकानाचा भाडा लाईट बिल मजुरांची मजुरी वाहतूक खर्च मोठा असतो ग्राहकांनी यावर्षी सजावटीकडे पाठ फिरवून पारंपारिक मखराकडे लक्ष केंद्रित केले आहे.
No comments