गटारी अमावस्याची फार्म हाऊस सजली गावठी कोंबड्यांना विशेष मागणी पर्यटन स्थळी बुकिंग वाढली दारू मटन मच्छीला आठ दिवस तेजी...!
नामदेव शेलार / मुरबाड : पावसाळ्यातील जुलै महिना वळगणीचा मासे चिंबोरी मोठे खाण्याचा संपूर्ण महिन्यात मौजमजा करून शेवटची गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी खवय्यांची तयारी सुरू झाली आहे.
येत्या वर्षी गटारीची जय तयारी सुरू आहे फार्म हाऊस बंगलो पर्यटन स्थळाच्या रहिवासी लॉज हॉटेल बुकिंग झाले आहेत गत वर्षापेक्षा गटारीच्या रात्रीच्या भाड्यात वाढ झाल्याची चर्चा आहे ऑनलाइन बुकिंग झाल्याने अनेकांना माळशेज घाट नाणेघाट परिसरातील नदी नाले ओढ्याचा आधार दिवसभरासाठी घ्यावे लागणार आहे.
गटारी अमावस्या ला या वर्षी गावठी कोंबड्यांना अधिक मागणी असल्याने ग्रामीण भागात तसेच पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे चिकन विक्रेत्यांनी सांगितले ग्रामीण भागातील गावठी कोंबडे 500 ते 700 रुपयांना विक्री होणारे कोंबडे गटारीच्या तोंडावर 1000 ते 1200 रुपयाला बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत. बकरे मेंढ्यांच्या मटणाला अधिक पसंती मिळाली असून मटणाची बुकिंग झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र समुद्रात मासे मारीला बंदी असल्याने पापलेट कोळंबी वांब सुरमई या मच्छी बाजारात येत नसल्याने डॅम धरणाची गावठी मच्छी तेलप्पा करला माशांना भाव मिळत आहे 80 रुपये किलो असणारे मासे दोनशे रुपये किलोच्या भावाने विक्री होत आहेत.
गटारी अमावस्याला त्याचे भाव अधिक भडकण्याची शक्यता आहे.
गटारीला मटन मच्छी सोबत दारू सिगरेट गुटखा ठंडा यांनाही अधिक मागणी आहे गावठी देशी विदेशी बनावट दारूची विक्री मोठ्या प्रमाणात विक्री होते त्याकडे उत्पादक शुल्क अधिकाऱ्यांचे नेहमीच जाणून-बुजून दुर्लक्ष होते पान टपरी किराणा दुकानापासून धाबे हॉटेलवर चोरटी दारू डबल भावाने विक्री होते तसेच गुटखा सिगारेट यांचेही दाम दुप्पटीने विक्री होत असताना गटारीचे चाहत्यांना आत्तापासूनच साठवणुकीचे वेध लागले आहेत.
मोठ्या प्रमाणात गटारी गराबाहेर साजरी केली जाते रिसॉर्ट मध्ये डीजे स्विमिंग पूल असल्याने रिसॉर्टची बुकिंग फुल झाली आहे मुरबाड तालुक्यातील रिसॉर्ट फार्म हाऊस धाबे हॉटेल गटारीला हाउसफुल होतील त्याची सुरक्षा कडे पोलिसांची करडी नजर राहणार आहे गटारी अगोदरच राजकीय पक्षांचे स्नेहभोजन कार्यकर्ते मेळावे माळशेज घाटात पार पडले आहेत.
No comments