आमने रिंगणाजवळ 50 एकरात भव्य क्रिकेट स्टेडियम परिसरामधील सरकारी खाजगी असणाऱ्या बेकायदेशीर दगड खाणीवर येणार संक्रांत महसूल पोलीस पोलुशन बोर्ड यांचे लाखोच्या हप्त्यावर पाणी...
नामदेव शेलार / ठाणे : मुंबई नवी मुंबई उपनगर मध्ये क्रिकेटचे स्टेडियम असताना ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात समृद्धी महामार्ग लगत आमनेजवळ भव्य दिव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्याचे काम हाती घेतले असून त्याला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आमने पडघा येथे संपतो त्याला लागून वडनेरा अहमदाबाद गुजरात ते पुणे गोवा नॅशनल हायवे ला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर नवीन क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे त्याचा टेंडर पूर्ण झाल्यावर पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांनी घोषणा केल्याने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तारुण्यात चैतन्य फुलले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे रहिवाशी एकनाथजी शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात नावलौकिक नोंद ग्रामीण भागाला रोजगार निर्माण करणारा प्रकल्पाचा संकल्प उभा केल्याने ठाणे पालघर ग्रामीण भागातील शेतकरी तरुण वर्ग क्रिकेट प्रेमींना तिसऱ्या मुंबईचा वेध लागले आहे.
ठाणे जिल्ह्याच्या या ग्रामीण भागात प्रामुख्याने शेती दुग्ध व्यवसाय भाजीपाला वीटभट्टी दगड खाणी हे प्रामुख्याने पारंपारिक व्यवसाय होते त्यामध्ये गेल्या वीस वर्षाच्या कालावधीत लॉजिस्टिक पार्क गोडाऊन प्रकल्प उभे राहिले परदेशीय कंपन्यांनी हजारो कोटीची गुंतवणूक करून ग्रामीण भागामधील लाखो लोकांना रोजगार दिला मात्र आतकोली, वाशेरे,आमने, पिसे,चिराडपाडा या पाच गावांची गुरे जनावरे करण्यासाठी मोकळी असलेली सरकारी गुरचरण 64 हेक्टर 22 गुंठे तळवली तर्फे सोनावळे व इतर तलाठी कार्यालय अंतर्गत जमिनी आहेत यामधील 50 एकर जमिनीवर भव्य क्रिकेट स्टेडियम उभे राहत आहे उर्वरित शासकीय आणि खाजगी जमिनीवर गेली पंधरा वर्षात बेकायदेशी दगड खाणी विनापरवाण्या सुरू आहेत त्या पोटी महसूल अधिकारी तलाठी सर्कल पोलीस विभाग पोलुशन बोर्ड अन्य संबंधित सरकारी स्वराज्य संस्था मधील वसूलदारांना लाखो रुपये मासिक हप्ता मिळत होता त्यावर पाणी फिरण्याचे येतील शेतकऱ्यांनी सांगितले तीस फुटाच्या वर दगडाचे उत्खनन करून महसूल विभागाची कोटी रुपयांची रॉयल्टी चोरी झाली असताना महसूल विभाग कारवाई करत नाही थातूरमातूर कारवाई करून सुरू असलेल्या दगड खाणी चालकांनी ब्लास्टिंग करण्यासाठी हजारो टन दारूगोळा स्फोटके कुठून आणले पाच किलोमीटर पर्यंत स्फोटाचा आवाज रात्रंदिवस येतो परिसरातील शेतीचे अफाट नुकसान झाले आहे प्रदूषण होत आहे याच परिसरातून पेट्रोल लाईन गेली आहे अनेकांनी तक्रारी केल्या मात्र संबंधित विभागाने कारवाई केली नाही परंतु अवैध्य दगड खाणीचा गाशा नव्या क्रिकेट स्टेडियम मुळे गुंडाळणार आहे. ठाणे जिल्ह्याचा विभाजन होणार आहे
कल्याण जिल्ह्याची निर्मिती झाल्यास नव्या जिल्ह्यातील भिवंडी शहापूर मुरबाड कल्याण अंबरनाथ कर्जत वाडा येथील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होणार आहे लगतच्या परिसरातून मेट्रो रेल्वे सुविधा सुरळीत होणार असून समृद्धी महामार्ग वडोदरा गुजरात दोन्हीही रस्त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार गोडाऊनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याच्या हालचाली वाढल्या आहेत आमने समृद्धी महामार्ग रिंगण लगत क्रिकेट स्टेडियम होत असल्याने परिसरात इंटरनॅशनल हॉटेल मॉल व्यवसाय उभे राहणार आहेत शासनाने याच परिसरात एक विमानतळ उभे करावे अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. स्टेडियम जवळ वाशेरे येते जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालयला 40 एकर जमीन देण्यात आली आहे. त्यामुळे येथील सुरक्षा सुरक्षित राहणार असल्याचे बोलले जाते
पुढच्या नव्या सरकारच्या अगोदर आताच्या तिघाडी सरकारने येथील शासकीय
जमिनी तसेच काही गरीब शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीवर दादागिरी दहशतीने दगड
खाणी चालवल्या पोलिसांना प्रचंड ब्लास्टिंग करणारे स्फोटके दिसली नाही
महसूल विभागाला शासनाची शेकडो कोटीची रॉयल्टी चोरी झाली ती दिसली नाही
राजकारण्यांनी खदान मालक चालकांना राजकीय मताच्या लाचारीसाठी पाठीशी घालून
स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान केले त्यांच्यावर येथील
शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी गरिबांच्या
तक्रारीला न्याय देत नाहीत मात्र माती दगड चोरी करणाऱ्यांना पाठीशी घालतात
असा पाठबळ नव्या क्रिकेट स्टेडियम मुळे पंचर होणार आहे भूमी अभिलेख तालुका
अधिकारी कर्मचारी स्थानिक परवाने देणारे स्वराज्य संस्थेचे अधिकारी
लोकप्रतिनिधी यांनी परवाने दाखले मोजणी नकाशा तलाठी सर्कल पंचनामे यांची
चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
No comments