web-banner-lshep2024

Breaking News

सरळगाव येथील वादग्रस्त डॉक्टराच्या गाडीवर गोळीबार हॉस्पिटल बंद करण्याची भयभित स्थानिक नागरिकांची मागणी


गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलच्या एका डॉक्टराच्या गाडीवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी फायरिंग केल्याची घटना घडली असून येथील नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.

 सरळगाव शहापूर किन्हवलीकडे जाणाया रस्त्याशेजारी हे हॉस्पिटल असून गेल्या वर्षे भरापासून हा वादग्रस्त डॉक्टरमुळे परिसरात काहीना काही घटना घडत असून मुख्य म्हणजे या याच डॉक्टरासोबत या घटना का घडतात हे मात्र गुलदस्त्यात आहे.

  या डॉक्टराची पारदर्शक चौकशी यंत्रणा का करत नाही या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण असून येथील वादग्रस्त डॉक्टराचे श्रीकृष्णा हॉस्पिटल बंद करुन भयभित नागरिकांना सुटकेचा श्‍वास द्यावा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 सदरील श्रीकृष्णा हॉस्पिटल मध्ये काही वर्षोपुर्वी याच हॉस्पिटल मध्ये डॉक्टराच्या चुकीमुळे रुग्ण दगावल्याची माहिती सुत्रांकडून समजत असून हा वाद तेव्हापासून आज तयागत या गोळीबारीतून दिसून येत आहे.सदरील डॉक्टराविरुध्द विविध सामाजिक संघटनांनी आवाज उठवला होत मात्र या डॉक्टराची चौकशी आजही गुलदस्त्यात असून या श्रीकृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टराला कोणाचा पाठबळ आहे कोण पाठीशी घालत आहे त्याची सखोल चौकशी करुन येथील भयभित नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

No comments