web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मध्ये पुन्हा चोरी सत्र पोलीस पेट्रोलिंग बंद दुकानदार मुरबाडकरात घबराट..!

नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड मध्ये गेली 3वर्षे बंद असलेली चोरी सत्र पुन्हा सुरु झाली आहे मुरबाड पोलिसांनी रात्रीची पेट्रोलिंग बंद केल्याने चोरट्यानी आपला जुना धंदा पुन्हा तेजीने सुरु केला आहे. रविवारी मध्यरात्री मुरबाड बाजार पेटेतील तीन दुकानांच सेंटर तोडून लाखोंची रोख रक्कम व सामान चोरून नेले आहे त्या मूळे मुरबाड बाजार पेठेत दुकानदार आणि घर मालकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

              तत्कालीन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रसाद पांढरे यांनी मुरबाड शहरात रात्रं दिवस पोलीस पेट्रोलिंग सुरु करून चोऱ्या घरफोड्या बंद केल्या होत्या गुन्हेगारीला आला घातला होता मात्र आता सरळगांव मध्ये डॉक्टर यांच्या गाडीवर गोळीबार, मुरबाड मध्ये चोऱ्या घटना घडल्याने पुन्हा मुरबाडची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. याकडे लोकप्रतिनिधी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे, गुन्हे घडतात यांची माहिती घटना घडल्यावर सर्वांना माहिती होते परंतु मीडियाला माहिती दिली जात नाही नवीन कायद्याने पोलीस आता चोर, गुन्हेगार, यांना कसा चाप लावतात की गुन्हा दडपतात हे पहाणे उत्सुकता वाढली आहे.

             मुरबाड पोलीस गुन्ह्याचा अधीक तपास करत आहेत मुरबाडच्या बाजार पेठेत, दुकानात सीसीटीव्ही केमेरे असताना पोलिसांना चोरटे कसे तात्काळ सापडत नाहीत असा सवाल मुरबाड करानी केला आहे.

 

No comments