web-banner-lshep2024

Breaking News

विद्युत महामंडळाच्या मनमानी कारभाराचा वायरमन बळी कमलाकर भोईर यांचा रोड लाईट सुरु करताना शॉक लागून मृत्यू


नामदेव शेलार/ मुरबाड : शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून देखील मुरबाड मधील विद्युत पोल तारा (वाहिनी) ट्रांसफार्मर बदलले नसल्याने लाईट चालू करताना वायरमन च्या शॉक लागून मृत्यू होण्याचा प्रमाण वाढला आहे मंगळवारी मुरबाड नगरपंचायतीचे वायरमन कमलाकर भोईर यांचा शहरांमधील रोड लाईट चालू करताना शॉक लागून मृत्यू झाला असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले शॉक लागून वायरमन चा मृत्यू होण्याचा प्रमाण मुरबाड मध्ये वाढत चालला असून त्याला विद्युत महामंडळाची मनमानी निकृष्ट कारभार जबाबदार असल्याची चर्चा आहे गेल्या वर्षभरातील ही दुसरी तिसरी घटना असल्याचे बोलले जात आहे. कमलाकर भोईर मुरबाड शहरांमधील सोनार आळी येथील रोडवरील लाईट लावण्यासाठी पोलावर चढले होते त्यावेळी अचानक विद्युत प्रवाह आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे 

    ऑन ड्युटी मृत्यू झालेल्या कमलाकर भोईर यांच्या मृत्यूला कारणीभूत कोण विद्युत महामंडळाचा भोंगाळ कारभार ही सरकार असा संताप येथील रहिवाशांनी व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तात्काळ मदत देऊन त्यांच्या वारसांना नगरपंचायत मध्ये नोकरीला घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे मुरबाड शहरातील एकाच पोलावर हाय स्पीडची विद्युत वाहिन्या टाकून त्याच खाली लोकल विद्युत लाईन टाकण्यात आली आहे. 

         एसटी आणि एलटी लाईन वेगवेगळ्या नाहीत तसेच स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर किंवा नगरपंचायतीच्या स्वतंत्र रोड लाईटचे पोल नाहीत परंतु विद्युत पोल तारा टाकण्यासाठी ट्रान्सफॉर्मर साठी नगरपंचायत विद्युत महामंडळ यांनी कोटी रुपये खर्च गेल्या दहा वर्षात केले आहेत काही विद्युत पोलांना पावसाळ्यात शॉक उतरत असून त्याकडे विद्युत महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे मुरबाड शहरात स्वतंत्र रोड लाईट विद्युत पोल तारा (वाहिनी) ट्रान्सफॉर्मर असावेत स्वतंत्र मेन लाइन असावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

No comments